Share

Virat Kohli : हे तर भारताचे दोन वाघ आहे…; विराट-सूर्यकुमार यादवची फलंदाजी पाहून चाहते झाले भलतेच खुश

virat kohli suryakumar yadav

fans react on virat kohli and suryakumar yadav innings  |  भारत टी २० वर्ल्डकपमधील २०२२ चा दुसरा सामना झाला आहे. भारत आणि नेदरलँड विरुद्ध हा सामना झाला. हा सामना भारतीय संघाने ५६ धावांनी जिंकला आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ गडी गमावून १७९ धावा केल्या. ज्यामध्ये शेवटच्या सामन्यातील हिरो विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. संघाची सुरुवात संथ असतानाही त्यांनी भारताला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेले.

विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवच्या घातक फलंदाजीने सर्वांनाच हैराण केले. त्यामुळे आता सोशल मीडियावर चाहते त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या जोडीने नेदकलँडच्या गोलंदाजांची झोप उडवली आहे.

दोन्ही फलंदाजांनी मिळून नेदरलँडच्या संघाच्या गोलंदाजांची चांगलंच कुटलं आहे. विशेषत: पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात संघाचा हिरो ठरलेल्या विराट कोहलीने नेदरलँडविरुद्धही आणखी एक अर्धशतक झळकावले आहे. एवढेच नाही तर कोहली शेवटपर्यंत नाबाद राहिला.

कोहलीने १४०.९१ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना ४४ चेंडूंचा सामना केला. त्यामध्ये त्याने ६२ धावा केल्या. यावेळी फलंदाजी करताना त्याने ३ चौकार आणि २ गगनचुंबी षटकारही दिसले. सूर्याविषयी बोलायचे झाले तर त्याने नाबाद ५१ धावांची स्फोटक खेळी केली.

सूर्यकुमार यादवने आपल्या या खेळीत २०४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. या घातक खेळीमध्ये त्याने ७ चौकार आणि १ षटकारही लगावला. या दोघांच्या जबरदस्त फलंदाजीमुळे सोशल मीडियावर चाहत्यांकडून विराट-सूर्यच्या वेगवान फलंदाजीचे जोरदार कौतुक होत आहे.

https://twitter.com/k_indiangirl7/status/1585553117244190723?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1585553117244190723%7Ctwgr%5E000f1d34d768d3708846a3fd6d842f4d8d3b2c09%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Fvirat-kohli-surya-ind-vs-ned%2F

एकाने म्हटले की विराट खरंच परत आलाय. तर एकाने म्हटले की सूर्यकुमार यादवची ही आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. तर दुसऱ्याने म्हटले की, विराट आणि सूर्याला एकत्र खेळताना जी मजा आहे ती मजा कशातच नाहीये. तर एकाने म्हटले की, सामन्याचा शेवट करणं कोणी विराट आणि सूर्याकडून शिकावे. तर एकाने म्हटले की हे भारताचे दोन वाघ आहे.

 

महत्वाच्या बातम्या-
kamal kishor mishra : धक्कादायक! मॉडेलसोबत रोमान्स करत होता ‘हा’ प्रसिद्ध निर्माता, पत्नीने पकडलं तर अंगावर घातली गाडी
Bachchu Kadu : मंत्रिपद नाही, तर ‘या’ कारणामुळे ५० आमदार नाराज; बच्चू कडू यांचा मोठा खुलासा
bacchu kadu : आधी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा, आता थेट ठाकरेंचंही समर्थन; बच्चू कडू मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now