अनेक अभिनेते, अभिनेत्री आपल्या कलेच्या माध्यमातून लोकांच्या मनात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करत असतात. ते वेगवेगळ्या भूमिकेमधून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवत असतात. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून अपूर्वा नेमळेकर घराघरात पोहचली आहे.
या मालिकेमध्ये ती शेवंताच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाली. ही मालिका सोडल्यानंतर आपल्याला ती तुझं माझं जमतंय या मालिकेमध्ये दिसली. यामध्ये तिने पम्मी ही भूमिका साकारली होती. या मालिकेमध्ये तिच्या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली गेली.
यानंतर तिने स्वराज्य सौदामिनी ताराराणी या सिरियलमध्ये काम केले. या सिरियलमध्ये तिने राणी चेन्नम्माची भूमिका साकारली. तिच्या विविध भूमिकांसाठी प्रेक्षकांकडून वेळोवेळी कौतुकाचा वर्षाव देखील होतो. सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात तिचा चाहत्यांचा वर्ग आहे. वेळोवेळी सोशल मीडियावर ती फोटो पोस्ट करत असते.
सोशल मीडियावर देखील ती सक्रिय असते. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर ask me anything याद्वारे तिच्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिलेली आहेत. यावेळी एकाने तिला तिच्या रिलेशनशिप विषयी प्रश्न विचारला, या प्रश्नाचे देखील तिने उत्तर दिले आहे.
यावेळी अपूर्वाला एका चाहत्यानं तू सिंगल आहे की मॅरिड असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला अपूर्वाने सध्या तरी मी सिंगल आहे, पण त्या खास व्यक्तीची (soulmate)ची वाट पाहतेय अस उत्तर दिलेलं आहे. तसेच रोहन देशपांडेसोबत अपूर्वा नेमळकर विवाहबंधानात अडकली होती.
या दोघांचा लग्नसोहळा मुंबईमध्ये पार पडला होता. परंतु त्यांचे नाते जास्त काळ टिकून राहिले नाही.रात्रीस खेळ चाले ही सिरियल 22 फेब्रुवारी 2016 पासून सुरू झाली होती. या सिरियल मधील अण्णा, अण्णाची बायको, माधव, दत्ता, नीलिमा, सरिता, छाया आणि अभिराम ही पात्र लोकप्रिय होती.
परंतु यांच्यापेक्षाही ज्या व्यक्तिरेखेला लोकांकडून जास्त पसंती मिळाली त्या म्हणजे पांडू, सुशल्या आणि शेवंता. दरम्यान, ही मालिका चालू झाली तेव्हा याला कोकणची बदनामी होते या कारणावरून विरोध ही झाला होता. पण लोकांना ही मालिका आवडू लागल्यानंतर हा विरोध ही नाहीसा झाला.
महत्वाच्या बातम्या
मॅनेजमेंट मुंबई संघावर नाराज, ‘या’ बड्या खेळाडूसह चार खेळाडूंची करणार संघातून हकालपट्टी
तो शहीद झाला असला तरी मला त्याचा अभिमान आहे कारण.., मुलाच्या हौतात्म्यावर वडीलही भावूक
भाजपचा नवा फॉर्म्युला, ७० वर्षांवरील उमेदवारांना तिकीट नाही; ‘या’ बड्या नेत्यांचा पत्ता कटणार
मंचावर मोदींसमोरच एमके स्टॅलिन यांनी भाजपवर केले गंभीर आरोप, भाजपने ‘असे’ दिले प्रत्युत्तर