Share

प्रसिद्ध निर्मात्याने काश्मिर फाईल्ससाठी रिकामे केले थिएटर; म्हणाला, ‘राष्ट्र प्रथम, माझा सिनेमा नंतर’

गुजरातमधील ‘द कश्मीर फाइल्स’ला (the kashmir files) जास्तीत जास्त व्ह्यूज मिळावेत, यासाठी गुजराती चित्रपट ‘प्रेम प्रकरण’च्या (prem prakaran) निर्मात्यांनी त्यांचा चित्रपट सिनेमागृहातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट १५ मार्चलाच प्रदर्शित झाला होता, तरीही निर्मात्यांनी तो पडद्यावरून हटवला. या गुजराती चित्रपटाच्या वितरक वंदना शाह यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट चांगला चालला आहे.

प्रेम प्रकरण या चित्रपटाच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे की काश्मिर फाईल्सचे अधिक शो झाले पाहिजेत. निर्मात्यांनी सांगितले की, आम्ही काही दिवसांनी ‘प्रेम प्रकरण’ या चित्रपटाद्वारे सिनेमात परतणार आहोत, असे त्या म्हणाल्या. त्यांनी काश्मिर फाईल्ससाठी स्वत:चा चित्रपट हटवला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माते चंद्रेश भट्ट यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्र प्रथम येते.

काश्मीर फाईल्स या सिनेमाच्या जादूचा आनंद तुम्ही लुटा. लवकरच आपण पुन्हा थिएटरमध्ये भेटू. आमच्या प्रेक्षकांच्या अफाट प्रेमाबद्दल धन्यवाद. आम्ही लवकरच चित्रपटगृहात परतणार आहोत. वंदे मातरम्. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एक भारतीय म्हणून, ते द काश्मीर फाइल्सला स्वताच्या चित्रपटापेक्षा अधिक मानतात.

ते म्हणाले की, माझा चित्रपट गुजराती असला तरी तो चित्रपटगृहांमधून परत घेणे हा एक मार्ग आहे ज्याने आपण द काश्मीर फाईल्सच्या अधिक शोसाठी मार्ग काढू शकतो. माझा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. पण आपण नंतर कधीतरी सिनेमा प्रदर्शित करू.

गुजराती चित्रपट निर्मात्याचे हे औदार्य पाहिल्यानंतर विवेक अग्निहोत्रीने त्यांचे आभार मानले आणि प्रेम प्रकरणाच्या संपूर्ण टीमचे आभारी असल्याचे गुजरातीमध्ये ट्विट केले. ते म्हणाले की, “मला आशा आहे की प्रेम प्रकरण या चित्रपटालाही यश मिळेल. खूप धन्यवाद. त्याच वेळी, द काश्मीर फाइल्सच्या मुख्य अभिनेत्यानेही त्यांचे आभार मानले.

अभिनेता म्हणाला की, चंद्रेश भट्ट यांचे आभार कसे मानावेत, माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांनी आमच्या चित्रपटाला दिलेल्या प्रत्येक पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. काश्मीर फाईल्स आता लोकांचा चित्रपट आहे आणि तो माझ्या हृदयाच्या जवळ ठेवल्याबद्दल धन्यवाद. प्रेमप्रकरणालाही भरघोस यश मिळो अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद.

https://twitter.com/bhatt_chandresh/status/1503797984114319360?s=20&t=czivGc6Iio-fdv1QPIa0VQ

महत्वाच्या बातम्या
द कश्मीर फाइल्स: काश्मिरी पंडितांच्या पलायनाला नक्की कोण जबाबदार? काँग्रेस की जगमोहन?
युपीत आम्हीच जिंकलोय! ३०४ जागांवर विजयी झाल्याचा अखिलेश यांचा दावा; दिली ‘ही’ आकडेवारी
सत्तेचा माज भोवला! भावजयीला बेदम मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदाराविरोधात गुन्हा दाखल
भयानक! ‘या’ शहरात कोरोनाचा हाहाकार, सापडले तब्बल २७ हजार रुग्ण, मोडले सर्व रेकॉर्ड

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now