ब्राझीलमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत ब्राझीलची एक पॉर्न स्टारही उतरणार आहे. ख्रिश्चन मजूर पक्षाकडून तिला ही निवडणूक लढवायची आहे. अडल्ट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या पॉर्न स्टारचे नाव बियान्का नाल्डी असे आहे. (famous pornstar enter in politics)
यंदा ब्राझीलमध्ये निवडणूका होणार आहे. त्यामुळे आता तिने राजकारणात उतरून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच निवडणुकीबाबत बोलताना ख्रिश्चन मतदारांना तिच्या जुन्या कामांमुळे कोणतीही अडचण येणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
आपल्या कामावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ती म्हणाली की, सेक्स हे पवित्र कृत्य आहे, त्याचा गैरफायदा घेणे योग्य नाही. सेक्स ही गोष्ट देवाने दिलेली आहे. प्रत्येकजण सेक्स करतो. प्राण्यांनाही त्याची गरज असते. माझ्या कामावर ढोंगीपणा करणारे आणि माझ्यावर टीका करणारे बरेच लोक आहेत.
तसेच प्रत्येकजण सेक्स करतो, फरक एवढाच आहे की मी कॅमेऱ्यासमोर करते. ख्रिश्चन मजूर पक्षाचा उमेदवार म्हणून रिओ दि जानेरो येथून निवडणूक लढवण्याची नाल्डी तयारी आहे. जरी ती एक इव्हेंजेलिकल ख्रिश्चन असली, तरीही ती आता कोणत्याही विशिष्ट धार्मिक शिकवणीचे पालन करत नाही.
ख्रिश्चन मजूर पक्ष हा ब्राझीलचा उजव्या विचारसरणीचा पक्ष मानला जातो. ख्रिश्चन लोकशाही, पुराणमतवादी उदारमतवाद आणि श्रमवाद ही त्यांची विचारधारा आहे. बियान्का नाल्डीने पाच वर्षांपूर्वी पॉर्न इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. पण पॉर्न स्टार होण्यापूर्वी ती नर्स टेक्निशियन होती.
पॉर्न स्टार बियान्का नाल्डी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये तिच्या राजकीय पदार्पणाबाबत बोलली होती. पॉडकास्टमध्ये विचारले असता तिने सांगितले की, मला आमंत्रण मिळाले तर मी नक्कीच राजकारणात जाईन. त्यानंतर उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची ऑफर आली आणि तिने ती स्वीकारली.
महत्वाच्या बातम्या-
शाहरुख खानचा ‘मॉन्स्टर’ लुक आला समोर , बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित
‘सत्ताधारी शहरातील कुत्र्यांची नसबंदी करण्यात व्यस्त आहेत’, अजित पवारांचा भाजपला टोला
‘या’ चार बोल्ड वेबसिरीजने घातलाय धुमाकूळ, चुकूनही घरच्यांसोबत पाहू नका, नाहीतर होईल फजिती