पारंपारिक कोळी गीतांचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध लोकशाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसापासून ते प्रकृती अस्वस्थामुळे रूग्णालयात दाखल होते. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर मुंबईतील वेसावे स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रकृती अस्वस्थामुळे काशीराम चिंचय यांना सुरुवातीला अंधेरीतील ब्रम्हकुमारी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना केईएम रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी शुक्रवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला.
मृत्यूसमयी ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन विवाहित मुली असा परिवार आहे. काशीराम चिंचय यांच्या निधनाने आगरी-कोळी समाजावर शोककळा पसरली असून अनेकांद्वारे त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोशल मीडियाद्वारेही अनेकजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
काशीराम चिंचय यांनी ‘वेसावकर आणि मंडळी’ या कलापथकाद्वारे अनेक गाण्यांची निर्मिती केली. आगरी-कोळी समाजातील पारंपारिक गीतांचा ठेका त्यांनी सातासमुद्रापार नेला. या गीतांवर त्यांनी आबालवृद्धांसह सर्वांनाच ठेका धरायला भाग पाडले.
काशीराम यांनी ‘डोल डोलतंय वाऱ्यावर’, ‘डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला’, ‘वेसावची पारू’, ‘हिच काय गो गोरी गोरी गोरी’, ‘मी हाय कोळी’, ‘सन आयलाय गे’ यासारख्या कोळीगीतांचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या या गाणी आजही अनेकांच्या ओठावर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
जेव्हा लता मंगेशकर यांना जीवे मारण्याचा झाला होता प्रयत्न, असा वाचला होता त्यांचा जीव
महाराष्ट्र हळहळला! नाशिकच्या जवानाला देशसेवा बजावताना नेपाळ सीमेवर वीरमरण; कारण वाचून संताप येईल
..त्यावेळी ढसाढसा रडत असताना अनवाणी पायांनी रस्त्यावरून पळत सुटली होती रेखा, वाचा किस्सा