भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू सचिन तेंडूलकर आणि राहूल द्रविड यांचे मुलं सध्या क्रिकेट विश्वात चांगलेच चर्चेत आलेले आहे. दोघांची मुलं एज ग्रुप क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करताना दिसत आहे. सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जून तेंडूलकरला तर मुंबई इंडियन्स संघाने गेल्यावर्षी विकत घेतलं होतं. (faham ul huq century)
तसेच राहूल द्रविडचा मुलगा समित द्रविडही शालेय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. अशात सचिन आणि द्रविडच्या नंतर एका पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा मुलगा चर्चेत आला आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू मिसबाह उल हक याचा मुलगाही पाकिस्तानमधील एज ग्रुपमध्ये धमाकेदार कामगिरी करताना दिसून येत आहे.
नॅशनल अंडर १६ चॅम्पियनशीपच्या सामन्यात मिसबाहचा मुलगा फहाम उल हकने शतक ठोकले आहे. सेंट्रल पंजाबकडून खेळताना त्याने शतक ठोकले आहे. ज्यामुळे नॉर्थन व्हाईट्सचा ४९ धावांनी पराभव झाला आहे. या सामन्यात फहाम उल हकने महत्वाची कामगिरी बजावल्यामुळे त्याच्या संघाला हा सामना जिंकता आला आहे.
फहामने १४४ बॉलमध्ये १०२ धावा केल्या आहे. ज्यामुळे सेंट्रल पंजाबने ४५ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून २४६ धावा केल्या होत्या. मुलतानच्या मोहम्मदवाला ग्राऊंडवर हा सामना झाला होता. २४७ धावांच्या लक्ष्याचा सामना करताना नॉर्थन व्हाईट्सचे फलंदाज काही कमाल दाखवू शकले नाही आणि त्यामुळे पराभूत झाले.
नॉर्थन व्हाईट्सच्या संघ ४४ ओव्हरमध्ये १९७ धावा करत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून हसनैनने ८८ तर शमीर निसारने ३२ धावां खेळी खेळली होती. तर पंजाब सेंट्रल अली हसनने २२ धावा देत ४ विकेट घेतल्या, तर अली हसन बलोचने २८ धावा देत ३ विकेट घेतल्या.
दरम्यान, अंडर १६ स्पर्धेसाठी जेव्हा खेळाडूंची निवड झाली होती, तेव्हा पाकिस्तानमध्ये वाद निर्माण झाला होता. कारण मिसबाहचा मुलगा फहाम आणि सलमान बटचा मुलगा अलियान यांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण यामध्ये गेल्या काही सामन्यांमध्ये फहामने शालेय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ चित्रपटादरम्यान महिमा चौधरीसोबत घडली होती भयानक घटना, पूर्ण करिअरच झाले उद्ध्वस्त
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल; लग्नाबाबत विचारल्यावर म्हणाले..
ठाकरे सरकार वाईन विक्रीबाबतचा निर्णय मागे घेणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण





