Share

टीम डेव्हिडला फाफ डु प्लेसिसने पाठवला होता ‘हा’ मेसेज, त्यानंतर त्याने खेळली तुफानी खेळी

दिल्ली कॅपिटल्सच्या हृदयद्रावक पराभवाला भाग पाडणारा मुंबई इंडियन्सचा विध्वंसक फलंदाज टीम डेव्हिडने सामन्यानंतर खुलासा केला. त्याने सांगितले की, दिल्ली आणि मुंबई यांच्यातील आयपीएल 2022 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने त्याला एक मेसेज पाठवला होता.

या मेसेजनंतर टीम डेव्हिडने केवळ 11 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकार मारत सामना पलटवला होता. त्याच्या 34 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर मुंबईने पाच गडी राखून विजय मिळवत बंगळुरूला प्लेऑफचे तिकीट मिळवून दिले. सामना संपल्यानंतर त्याने सांगितले की, मला सकाळी फाफ डू प्लेसिसचा मेसेज आला होता.

त्या मेसेजमध्ये विराट कोहली, फाफ डू प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या तिघांचा फोटो होता. तिघांनीही मुंबई इंडियन्सची जर्सी घातली होती. ते आमच्या संघाला साथ देत होता. विशेष म्हणजे दिल्लीने मुंबईला विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य ठेवले होते.  प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला विजयी होणे गरजेचे होते.

हे लक्ष्य गाठण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला वानखेडे स्टेडियमवर मुंबईविरुद्धच्या सामन्यात चांगली सुरुवात करायची होती. आयपीएल-2022 प्लेऑफची परिस्थिती अशी होती की शेवटच्या लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला टॉप-4 मध्ये स्थान मिळण्याचे दरवाजे उघडे झाले.

पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने आरसीबीसाठी हे काम चांगले केले कारण त्यांनी दिल्लीवर 5 विकेट्सने मात केली. हा सामना पाहणाऱ्या आरसीबीच्या खेळाडूंच्या आनंदाचा ठिकाणा नाही राहिला. माजी कर्णधार विराट कोहलीसह त्याचे सहकारी खेळाडू प्लेऑफची भेट मिळताच आनंदाने नाचू लागले.

मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली होती, त्यामुळे या विजयाने मुंबईला काही फरक पडला नाही, पण आरसीबी आणि दिल्ली यांच्यातील प्लेऑफमध्ये आरसीबीने बाजी मारली. विजयासाठी 160 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या इशान किशन (48) आणि डेवाल्ड ब्रेव्हिसने (37) धावा केल्या.

टिम डेव्हिडच्या 11 चेंडूत 34 धावांच्या जोरावर 5 विकेट्स गमावून 160 धावा करता आल्या आणि सोपे लक्ष्य गाठता आले. त्यांनी पाच विकेट्सने विजय मिळवून दिल्लीला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले आणि बाहेर गेलेल्या बंगळुरूला शर्यतीत परत आणलं. त्यांच्या कामागिरीनंतर आरसीबीच्या आनंदाचा ठिकाणाच नाही राहिला.

महत्वाच्या बातम्या
शिवबंधन बांधणार की नाही? राजे म्हणाले, ‘आमचं ठरलंय’!, वाचा नेमकं राजेंच्या मनात आहे तरी काय..
भाजप मनसे युतीचा राज्यातील पहीला विजय; १३ पैकी ११ जागा जिंकत केला राष्ट्रवादीचा सुपडा साफ
जुळे असल्याचा घेतला गैरफायदा, भावाच्या पत्नीसोबत केलं धक्कादायक कृत्य; वाचून पायाखालची जमीन सरकेल
आशा भोसलेंनी सांगितला अमेरिकेतील ‘तो’ भयावह प्रसंग; म्हणाल्या, तेव्हापासून मी मुलांना…

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now