शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली असून, हा वाद आता सुप्रीम कोर्टात गेला आहे. एकेकाळी एकमेकांचे सुख – दु: ख शेअर करणारे आज मात्र वेगळे झाले आहे. शिवसेना पक्षवाढी साठी अहोरात्र झटणारे आज एकमेकांच्या विरोधात उभे राहिले आहे.
या घडामोडींना सुरुवात झाली शिनसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे. शिंदेंच्या बंडामुळे महाराष्ट्रातील राजकारण दिवसेंदिवस वेगळे वळण घेऊ लागले आहे. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अख्ख ठाकरे सरकारच धोक्यात आलं आहे. राज्यात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र देखील सुरू आहे.
तर दुसरीकडे केदार दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघेंची नियुक्ती करण्यात आल्याच्या बातम्या देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर आता खुद्द केदार दिघे यांनी खुलासा केला आहे.
केदार दिघे यांनी स्व:ता फेसबुक पोस्ट करत याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘माझी अशा कोणत्याही पदी नियुक्ती करण्यात आलेली नाही,’ असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे. केदार दिघे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे आता चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.
दरम्यान, या फेसबुक पोस्टद्वारे मी असे जाहीर करतो की, शिवसेना पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्षासाठी काम करीत आहे. कोणाचाही गैरसमज होऊ नये यासाठी मी माझी बाजू इथे मांडत आहे. धन्यवाद, जय महाराष्ट्र, असेही दिघे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटलं आहे.
वाचा काय आहे केदार दिघे यांची फेसबुक पोस्ट..?
‘मी केदार दिघे याद्वारे असे नमूद करतो की, समाज माध्यमातून एक पोस्ट व्हायरल केली जात आहे की माझी म्हणजे #केदार #दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पण मी अत्यंत नम्रपणे, प्रामाणिकणे सांगू ईच्छितो की अश्या प्रकारची माझी वा कोणाचीच नियुक्ती अधिकृतपणे या क्षणापर्यंत माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे अथवा मा.आदित्यजी ठाकरे अथवा शिवसेना पक्ष यांनी केलेली नाही.
या द्वारे मी असे जाहीर करतो की शिवसेना पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी पक्षसाठी काम करीत आहे कृपया कोणाचाही गैरसमज होऊ नये या साठी मी माझी बाजू इथे मांडत आहे. धन्यवाद..! सध्या केदार दिघे यांची फेसबुक पोस्ट सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
सेनेतून बंडखोरी करण्यासाठी माझ्याकडे गाड्या भरुन पैसे आले; शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा
पक्ष वाचवण्यासाठी पती उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून रश्मी ठाकरे उतरल्या मैदानात; ‘अशी’ आखली रणनीती
बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी चालेल, पण…; एकनाथ शिंदेंनी फोडली डरकाळी
एकेकाळी मुख्यमंत्र्यांचा जाहीरपणे समाचार घेणाऱ्या खासदाराचा आता ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले..