Share

इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले, त्या तथ्यांनुसार.., राज्यपालांनी दिलं स्पष्टीकरण

koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळं राज्यपाल पुन्हा वादात सापडले आहेत. समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं विधान कोश्यारी यांनी केलं होतं. (explanation of governor bhagat singh koshyari regarding controversial statement)

राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेससह, संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली. तसेच सोशल मीडियातून देखील राज्यपालांवर टीकेचा भडिमार होत आहे. राज्यपालांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटले.

आज राष्ट्रवादी काँग्रेसने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. राज्यपालांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अन केलेलं वक्तव्य मागे घ्यावं. अशी मागणी यावेळी करण्यात आली. याचबरोबर शिवप्रेमींनी देखील कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ घोषणा बाजी केली.

चौबाजूंकडून टीकेचा भडीमार झाल्यानंतर अखेर कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत ते आज जळगावमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना मात्र त्यांनी माफी मागण्याबाबत केलेल्या प्रश्नावर राज्यपाल कोश्यारी यांनी बगल देत त्यावर बोलणं टाळलं.

याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणा स्थान आहेत. माझी माहिती आणि अभ्यासाप्रमाणे समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. पण इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले. त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिल.’

दरम्यान, समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलं.आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी म्हणाले. औरंगाबादेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव, मराठी राजभाषा दिन आणि श्री दास नवमी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या
रितेशचा श्रीवल्ली गाण्यावर डान्स पाहताच जेनेलियाने दिला धक्का आणि.., व्हिडीओ पाहून खळखळून हसाल
मोठी बातमी! संभाजीराजेंनी उपोषण घेतले मागे, सरकारने मान्य केल्या ‘या’ मागण्या
अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, सुहाना खानसोबत ‘या’ चित्रपटात करणार काम
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला ईडीचा दणका, तब्बल १३ कोटींची मालमत्ता केली जप्त

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now