असे म्हणतात प्रेम आंधळे असते. या प्रेमात दोन लोक जवळ येत असतात, तर कधी कधी याच प्रेमामुळे लोकांना आपला जीवही गमवावा लागतो. प्रेम प्रकरणातून अनेक धक्कादायक घटना घडत असतात. आता अशीच एक घटना कोलंबियातून समोर आली आहे. (ex boyfriend kill women)
कोलंबियामध्ये चार मुलांच्या आईची तिच्या जुन्या प्रियकरानेच हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे तिला आधी मारहाण करून तिचे कपडे काढले आणि नंतर तिला फिरायला लावले. इतकंच नाही तर नंतर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. सध्या पोलिस या प्रकरणी तपास करत आहे.
‘डेली स्टार’च्या बातमीनुसार, कोलंबियामध्ये राहणारी २६ वर्षीय कॅली जोहाना तामायो बोर्केझ हीची हत्या ३० जानेवारीला करण्यात आली. तिचा मृतदेह सकाळी तिच्या घराजवळील एका उद्यानात विकृत अवस्थेत सापडला होता. तिच्या अंगावर एकही कापड नव्हते आणि तसेच तिचे शरीर पाहून तिला लाठ्या-काठ्या आणि दगडांनी मारल्यासारखे वाटत होते.
इतकंच नाही तर कॅलीचा चेहरा खराब करण्यात आला होता, ज्यामुळे तिची ओळख पटत नव्हती. मृत तरुणीच्या काकूने सांगितले की, कॅलीच्या डोक्यावर काठ्या आणि दगडांनी अनेक वार करण्यात आले, तिला केसांनी पकडून ओढले गेले. कॅलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु ती यशस्वी होऊ शकली नाही, असे घटनास्थळावरुन लक्षात येते.
कॅलीच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर पकडून कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी तिच्या काकूने केली आहे. तसेच पोलीस कमांडर कर्नल नेल्सन डाबे पॅराडो म्हणाले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही हत्या कोणी आणि का केली याचा शोध घेत आहोत. तसेच हल्लेखोराची माहिती देणाऱ्या व्यक्तीला लवकरच बक्षीस जाहीर केले जाईल, असे पोलीस कमांडर म्हणाले.
तसेच आम्ही लोकांना आवाहन करतो की त्यांनी समोर यावे आणि त्यांना जे काही माहीत असेल ते सांगावे, जेणेकरून लवकरात लवकर मारेकऱ्यापर्यंत पोहोचता येईल. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. ज्याच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे त्या माजी प्रियकराबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे बंडातात्या कराडकर आहेत तरी कोण?
धक्कादायक! दीड महिने घरात डांबून ठेऊन विवाहितेवर केले अत्याचार, मुलानी दरवाजा उघडला आणि..
सुकेश चंद्रशेखरने दिली प्रेमाची कबूली; जेलमधून चिट्ठी पाठवत म्हणाला, जॅकलिनने माझ्यासोबत..