विधानसभा निवडणूकीचे एक्झिट पोल दाखवण्याच्या दरम्यानच उत्तर प्रदेशमध्ये ईव्हिएम मशीन चोरीला गेल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामूळे भाजपनेच ईव्हीएम मशिनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप समाजवादी पार्टीने लावला होता. त्यांनी केलेल्या या आरोपानंतर बाहेर सापडलेल्या ईव्हीएम मशीन वेगळ्या असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी दिली आहे.
ईव्हीएम मशिन चोरी प्रकरणामुळे उत्तर प्रदेशमध्ये आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु झाले होते. त्यामुळे याविषयी खुलासा करत, “उत्तर प्रदेशात काही पक्षांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आम्ही त्यांना ईव्हीएमचे क्रमांक दाखवले. पण, ते क्रमांक स्ट्राँग रुममध्ये ठेवलेल्या आणि सील केलेल्या ईव्हीएमसोबत जुळत नाहीत.
त्यानंतर पक्षाचे समाधान झाले आहे. ज्या ईव्हीएममध्ये मत बंद आहेत, ते ईव्हीएम बाहेर काढता येत नाही.” अशी माहिती सुशील चंद्र यांनी दिली आहे. एव्हीएम मशिनच्या मुद्द्याला धरुन सपाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.
यावेळी त्यांनी म्हटले होते की, सरकार मतांची चोरी करत नाही तर ईव्हीएम घेऊन जाणारे एक वाहन कसे पकडले? आणि दोन वाहने पळून का गेली? मतांची चोरी होत नसेल, तर ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाड्यांना प्रशासनाने सुरक्षा का पुरवली नाही?
दरम्यान गुरुवारी विधानसभा निवडणूंकाची मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. अंतिम निकाल समोर येत असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत निदर्शने केली आहेत. दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांकडून ईव्हीएमचा निषेध करण्यात येत आहे.
कार्यकर्ते ईव्हीएमचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. ईव्हीएमचा निषेध करणारे बॅनर हाती घेत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. ‘ईव्हीएममुळे देशात लोकशाहीची हत्या होत आहे’, असं या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
चार राज्यातील भाजपच्या विजयाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ‘…हा काँग्रेसला धक्का’
इंग्रजी बोलणाऱ्या भिकाऱ्याची जवानाने केली चौकशी, त्याचे नाव गुगलला सर्च करताच बसला जबर धक्का
आई सरकारी शाळेत सफाई कामगार, वडिल शेतमजूर; मोबाईल रिपेअर करणाऱ्याने केला मुख्यमंत्र्यांचा पराभव