दीपक केसरकरांनी नारायण राणेंशी जुळवून घेण्याचे दिले स्पष्ट संकेत; मात्र ‘ही’ अट मान्य असेल तरच…

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडात प्रमुख भूमिका आमदार दीपक केसरकर यांनी बजावली. दहा दिवसांच्या नाट्यमय घडामोडीमद्धे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी वेळोवेळी माध्यमांसमोर येत शिंदे गटाची भूमिका मांडली. तर आता राज्यात शिंदे – फडणवीस  स्थापन झालं आहे.

नाट्यमय घडामोडीनंतर तब्बल महिन्याभराने आपल्या सावंतवाडी मतदारसंघात केसरकर काल दाखल झाले. कार्यकर्त्यांनी जोरदार त्यांचे मतदारसंघात स्वागत केले. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला,’ ‘शिवसेना जिंदाबाद,’ अशा घोषणा केसरकर यांचे सावंतवाडीत स्वागत करण्यात आले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना केसरकर यांनी म्हंटलं आहे की, ‘केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. मात्र त्यांनी आपल्या वागण्याची पध्दत बदलली पाहिजे. ज्यावेळी ते मातोश्रीवर टीका करणे बंद करतील, त्यादिवशी त्यांचा माझा वाद संपला.’

त्याचबरोबर ‘मी पालकमंत्री होतो त्यावेळी सांगत होतो, विकासासाठी राणे साहेबांसोबत काम करायला मला आवडेल. कदाचित त्यामुळे माझे मंत्रीपद गेले तर जाऊ देत, त्याचे दुख नाही,’ असंही केसरकर यांनी म्हंटलं आहे. पुढे बोलताना केसरकर यांनी विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला.

विनायक राऊत यांना लक्ष करताना केसरकर यांनी  म्हंटलं आहे की, राऊत खासदार माझ्यामुळे झाले आहेत त्यामुळे आमदारकीच्या आधी लोकसभा निवडणूक लागते हे त्यांनी लक्षात घ्यावे असा इशारा देत ते स्वत:ला मुख्यमंत्री समजत होते असा टोला लगावला.

दरम्यान, पुढे बोलताना केसकर यांनी म्हंटलं आहे की, ‘उद्धव ठाकरे यांनी आमदार, खासदार यांना समजून घेतले पाहिजे. वडीलकीच्या भूमिकेत त्यांनी तसा निर्णय घ्यावा, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे. त्यामुळे हा वाद कायम राहणार नाही, असेही सूतोवाच त्यांनी केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने चमत्कार घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?