अभिनेत्री ईशा गुप्ता ही बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. नेहमी ती इंस्टाग्रामवर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
इंस्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. ईशाच्या व्हिडीओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही ती आपल्या हॉट लुकमुळे चर्चेत आली आहे. चाहत्यांना तिचा हा बोल्ड लूक खूप आवडला असून त्यांनी कमेंट्सद्वारे हॉटनेसचे कौतुक केले आहे.
पाण्यातून बाहेर पडत असतानाचा तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. पाण्यातील तिचा हा क्लोज अप लुक असून ती डोळे बंद करून त्याचा आनंद घेत आहे. त्यानंतर ती पाण्यातून बाहेर पडत केसांवरून हात फिरवत असताना बोल्ड एक्स्प्रेशन देत आहे. या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा टॉप घातला असून चाहत्यांना तिचा हा बोल्ड व्हिडीओ खूप आवडला आहे.
सध्या ईशा गुप्ता ही ‘ आश्रम ३’ या वेबसीरिजमुळे खुप चर्चेत आहे. त्यातच तिने इंस्टाग्रामवर एक हॉट व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला असून हा व्हिडिओ पाहून चाहते तिच्या बोल्डनेसवर घायाळ झाले आहेत.
नुकतीच एमएक्स प्लेअरवर आश्रम ३ वेबसीरिज रिलीज झाली आहे. यामध्ये बॉबी देओल हा बाबा निरालाच्या आणि ईशा गुप्ता ही सोनियाच्या भूमिकेत असून या दोघांची केमिस्ट्री या सिरीजमध्ये पाहायला मिळत आहे. बाबा निराला हा सोनियाच्या जाळ्यात अडकला आहे.
या वेबसिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केले आहे. तर बॉबी देओल, ईशा गुप्ता, आदिती पोहनकर, चंदन रॉय सन्याल, सचिन श्रॉफ, दर्शन कुमार, अनुप्रिया गोएंका, अनुरीता झा, अध्यायन सुमन आणि त्रिधा चौधरी हे कलाकार या वेबसिरीजमध्ये आहेत. पहिल्या दोन भागांप्रमाणे हीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. समाजकारण आणि राजकारणावर आधारित या सीरीजमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘देशात बुलडोझर; लडाखमध्ये शेपूट’, शिवसेनेची भाजप सरकारवर घणाघाती टीका
माझे मुस्लिम मित्रमैत्रिणी दारू पितात, धुम्रपान करतात पण.., कंगनाचा नुपूर शर्माला जाहीर पाठिंबा
राखी सावंतच्या आरोपांवर रितेशनं सोडलं मौन, म्हणाला, माझे पैसै उडवत होती अन्…
“हिंदूंचा नायनाट करण्यासाठी पाकीस्तानने पुढाकार घ्यावा, मुस्लिम देशांनी एकत्र येत त्यांना पाठींबा द्यावा”