Share

नवीन वर्षाच्या निमित्ताने ईशा गुप्ता झाली रोमॅंटिक; बॉयफ्रेंडसोबतचे लिपलॉकचे फोटो झाले व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. याद्वारे ती तिचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. या फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ईशाने नववर्षाच्या दिवशीचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ती तिचा बॉयफ्रेंड मॅन्युअल कॅम्पोस गुलरला किस करताना दिसून येत आहे. तिच्या या फोटोची सध्या फारच चर्चा होत आहे.

ईशाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर नववर्षाच्या स्वागतादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दिसत आहे की, तिने ब्राऊन कलरचा डीप नेकलाईन ड्रेस घातला आहे. तर तिचा बॉयफ्रेंड मॅन्युअल कॅम्पोस गुलर ब्लॅक अँन्ड व्हाईट सूटमध्ये दिसत आहे. यामधील एका फोटोत ईशा बॉयफ्रेंड मॅन्युअलला लिपलॉक करताना दिसून येत आहे.

फोटो शेअर करत ईशाने लिहिले की, ‘२०२२ माझ्याकडून तुला’. यासोबतच तिने एक हार्टचा इमोजीसुद्धा पोस्ट केला आहे. ईशाच्या या पोस्टवर चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत. ईशाने, २०२० मध्ये स्पॅनिश बिझनेसमॅन मॅन्युअल कॅम्पोस गुलरसोबतच्या तिच्या नात्याची कबुली दिली होती.

https://www.instagram.com/p/CYL8Z7JAoqO/

ईशा गुप्ताने २००७ साली ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’ हा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने ‘जन्नत २’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती इमरान हाश्मीसोबत दिसली होती. त्यानंतर तिने ‘राज ३ डी’, ‘रूस्तम’, ‘बादशाहो’, ‘कमांडो २’ या चित्रपटातही काम केले आहे.

हिंदीशिवाय ईशाने काही तमिळ आणि तेलुगू चित्रपटातही काम केले आहे. तर लवकरच ती ‘देसी मॅजिक’ आणि ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटात दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

‘माय परफेक्ट वाईफ’ म्हणत रितेश देशमुखने शेअर केला जेनेलियाचा मजेशीर व्हिडीओ
VIDEO: बिग बॉस विनर विशाल निकमने दिलेले वचन केले पुर्ण, शिवलीला पाटील यांची भेट घेत म्हणाला..
‘शमिताला वोट करा यावेळी ती जिंकलीच पाहिजे’, शिल्पा शेट्टीचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
करण जोहरने दिल्ली सरकारकडे केली ‘ही’ विनंती, नेटकरी म्हणाले, ‘काहीही फालतू बोलू नको’

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now