तीन राज्यांमध्ये भाजपला भोपळा, सहा राज्यांत एक आकडी जागा; राष्ट्रवादीने दाखवली थेट आकडेवारी…

देशातील 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींचे निकाल गुरुवारी हाती आले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Election 2022 Result) योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्यावर लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाने (BJP) बंपर विजय मिळवला आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना 273 जागा जिंकण्यात यश आले.

या 5 पैकी 4 राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवत सत्तास्थापनेसाठी दावा ठोकला आहे. तर पंजाबमध्ये आपने स्पष्ट बहुमत मिळवत काँग्रेसचा अक्षरश: सुपडा साफ केला आहे. याचबरोबर कोरोना संकट, शेतकरी आंदोलन, स्थानिक हिंसाचार, भारत-चीन सीमावादाच्या मुद्यावरून भाजपला विरोधकांच्या टीकेचा सामना करावा होता.

या कारणांमुळे भाजपला या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश गाठता येणार नाही, असे विश्लेषकांचे मत होते मात्र हे सारे अंदाज खोटे ठरवत भाजपने आपला झंझावात कायम असल्याचेच या निकालांवरून दाखवून दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपची कोणतीही लाट आल्याचे अनेक वृत्तवहिनींनी म्हंटले.

याचाच धागा पकडत राष्ट्रवादीने थेट आकडीवारी दाखवत मोदींचा खरा चेहरा समोर आणला आहे. या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर अनेक वृत्तवाहिन्या मोदी लाट कायम असल्याचं दाखवत आहेत. परंतु पाच राज्यांव्यतिरिक्त इतर विधानसभांची माहिती घेतली तर भाजपची परिस्थिती वाईट असल्याचे, राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी म्हंटले आहे.

तशी मिटकरी यांनी थेट आकडेवारी स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर, गुजरात, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा या राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. मात्र सिक्कीममध्ये, मिझोराममध्ये, तामिळनाडूमध्ये भाजपला भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. तसेच ज्या राज्यांमध्ये भाजपचे युतीचे सरकार आहे तिथे भाजपला जबर धक्का बसला आहे.

मेघालय – 60 पैकी 2, बिहार – 243 पैकी 53, जम्मू काश्मीर – 87 पैकी 25 अशा जागा युतीचे सरकार आहे तिथे भाजपला भेटल्या आहेत. तर दुसरीकडे आंध्र प्रदेश – 175 पैकी 4, केरळ – 140 पैकी 1, पंजाब – 117 पैकी 3, पश्चिम बंगाल – 294 पैकी 3, तेलंगणा – 119 पैकी 5, दिल्ली – 70 पैकी 8, ओरिसा – 147 पैकी 10, नागालँड – 60 पैकी 12 या सहा राज्यांमध्ये भाजपला एक अंकी जागा मिळाल्या आहेत. यावरूनच मिटकरी यांनी टीका केली आहे.

याबाबत बोलताना मिटकरी म्हणतात, ’29 पैकी केवळ 10 राज्यांच्या विधानसभांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत आहे, तर तीन राज्यांमध्ये त्यांना भोपळाही फोडता आला नाही. सहा राज्यांमध्ये भाजपला एक अंकी जागा मिळाल्या आहेत, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
‘झुंड’ला मिळालेली ‘एवढी’ जबरदस्त रेटिंग पाहून अमिताभ बच्चनही झाले शॉक, म्हणाले, हे खूपच…
‘ना लग्न, ना मुले, ना सत्तेचे भोगी, ज्यांना पाहून घाबरतात गुंड, तेच आहेत युपीचे योगी’; कंगनाच्या हटके शुभेच्छा
“शरद पवार फक्त ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ नाहीत, फडणवीस असले १०-२० पवार खिशात घालून फिरतात”
VIDEO: पुणेकर जोमात बाकी कोमात! मेट्रोने प्रवास करणाऱ्या आजोबांना पत्रकाराने विचारला ‘असा’ प्रश्न, आजोबांनी दिलं हटके उत्तर