Share

“शिंदेसाहेब तुम्ही निष्ठावान शिवसैनिकासारखे वागला नाहीत, मी तुमच्यासोबत येऊ शकत नाही”

udhav

शिवसेना गोटातून आणखी एक बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर कल्याणमधील ज्येष्ठ शिवसैनिक विजय साळवी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मातोश्रीवर समोरासमोर बसले होते. अन् त्याच वेळी अचानक साळवी यांना बंडखोर एकनाथ शिंदे यांचा फोन आला.

वाचा सविस्तर पुढे काय घडलं..? विजय साळवी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मातोश्रीवर चर्चा करत बसले होते. मात्र त्याच वेळी साळवी यांना शिंदे यांचा फोन आला. एकनाथ शिंदे यांचा फोन असल्याच ठाकरे यांच्या लक्षात आलं. ‘तुम्ही दिलखुलास बोला,’ असं साळवी यांना सांगून मुख्यमंत्री तेथून उठून गेले.

त्यानंतर शिंदे यांनी आपण घेतलेली भूमिकेबद्दल साळवी यांना विचारणा केली. मात्र यावेळी बोलताना साळवी यांनी शिंदे यांना थेट सुनावले. ‘शिंदे साहेब आपण निष्ठावान शिवसैनिकासारखे वागला नाहीत. आपले चुकलेच आहे. त्यामुळे तुमच्या बरोबर येऊ शकत नाही,’ असं म्हणत साळवी यांनी शिंदे यांना सुनावलं.

पुढे बोलताना साळवी यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं की, “आपण शिवसेने सोबतच राहणार आहोत. ज्या संघटनेने मोठे केले ती संघटना सोडण्याचा विचार मनात येऊ शकत नाही,’ असे शिंदे यांना सांगितले. त्यावेळी शिंदे यांनी ‘मीही शिवसेनेतच आहे,’ असं साळवी यांनी शिंदे यांना स्पष्टच सांगितलं.

दरम्यान, शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे.

या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक चांगलेच तापले आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन करत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
शिवसेनेसाठी राष्ट्रवादी रणांगणात उतरली; आमदार थांबलेल्या गुवाहाटीतील हाॅटेलबाहेर..
VIDEO: भीषण अपघातानंतरही उभा राहून करू लागला विचित्र गोष्टी, लोकं म्हणाले, ‘भूत शिरलं आहे वाटतं’
‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दिला एकनाथ शिंदेंना पाठिंबा; म्हणाले, ते माझ्या सख्ख्या भावासारखे…

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now