आज राजकीय सत्तासंघर्षाचा सातवा दिवस आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य सुरु झालं. अजूनही शिंदे यांनी माघार घेतलेली नाहीये. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून शिवसेना गोत्यात आली आहे.
तर तब्बल सहा दिवसांनी आज हॉटेल रॅडिसनच्या प्रवेशद्वाराजवळ येत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘आमच्यासोबत 50 आमदार आहेत, ते सर्वजण आनंदात आहेत. आमचे प्रवक्ते तुमच्याशी संवाद साधत आहेत, वेळोवेळी ते भूमिका मांडत आहेत,’ असं यावेळी बोलताना शिंदे यांनी म्हंटलं आहे.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. आमचे कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांची नावे जाहीर करा, असे थेट आव्हान एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. तब्बल सहा दिवसांनी माध्यमांसमोर येत शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पुढे बोलताना शिंदे यांनी म्हंटलं आहे की, इथं आलेले 50 आमदारा स्वखुशीने आले आहेत. 50 आमदार आमच्यासोबत असून ते आनंदात असल्याचं ते म्हणाले. तसेच, लवकरच मुंबईला येत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी तारीख जाहीर केलेली नाहीये.
पुढे बोलताना शिंदे यांनी म्हंटलं आहे की, ‘आम्ही अजूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक असल्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. आम्ही या ठिकाणी एक भूमिका घेऊन आलो आहोत. यामध्ये कोणताही स्वार्थ नसल्याचा दावा देखील यावेळी शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, दुपारी दीडच्या सुमारास एकनाथ शिंदे यांनी हॉटेल ‘रेडिसन ब्लू’च्या मुख्य प्रवेशद्वारावर पत्रकारांशी संवाद साधला. गुवाहाटीमधील हॉटेल ‘रेडिसन ब्लू’च्या गेटवर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांच्या काही प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी बोलताना शिंदे यांनी शिवसेनेला टार्गेट केले.
महत्त्वाच्या बातम्या
शिंदे गटातील ‘हा’ मंत्री म्हणतो मी शिवसेनेतच, उद्धव ठाकरेच माझे नेते; एकनाथ शिंदेना मोठा धक्का
‘या’ शिवसेना नेत्याने मनोहर जोशींचं घर जाळण्याचे आदेश दिले; सदा सरवणकारांचा गौप्यस्फोट
लक्ष द्या! ‘या’ पाच वाईट सवयी पुरुषांचा sperm count कमी करू शकतात, जाणून घ्या
प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात केले दाखल; मुलाने दिली ‘ही’ महत्वाची अपडेट