Share

एकनाथ शिंदेंवर संशय आला तेव्हाच त्यांना फोन केला, मिळालं होतं ‘हे’ उत्तर, उद्धव ठाकरेंचा खुलासा

महाराष्ट्रातील राजकीय वादळ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी बैठक झाली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, तुमच्यातील अनेकांना काही प्रेमळ आणि काही धमक्यांचे फोन येत येतील.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शिवसेना तलवारीसारखी आहे, म्यानात ठेवली तर गंज चढेल आणि जर तुम्ही ती  बाहेर काढली तर ती चमकते आता चमकण्याची वेळ आली आहे. ते पुढे म्हणाले, हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप आणि शिवसेना यांना अस्पृश्य मानले जात असताना आणि भाजपसोबत कोणी जायला तयार नव्हते, तेव्हा हिंदुत्वाच्या मतांचे विभाजन होऊ नये, असे बाळासाहेब म्हणाले. आम्ही भाजपसोबत राहिलो आणि आता त्याचा फटका सहन करत आहोत. ज्यांनी आम्हाला सोडले त्यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही. भाजपला एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे शिवसेनेला संपवायचे आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मी निरुपयोगी आणि पक्ष चालवण्यास असमर्थ आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा. मी पक्षापासून दूर राहण्यास तयार आहे. बाळासाहेबांनी सांगितले होते म्हणून आजवर तुम्ही माझा आदर केलात. जर तुम्ही म्हणत असाल की मी पक्ष चालवायला योग्य नाही तर मी आता पक्ष सोडायला तयार आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या बंडखोरीचा उल्लेख करून एक सांगितले की, काही दिवसांपूर्वी मला संशय आल्याने मी एकनाथ शिंदे यांना फोन करून सांगितले, शिवसेनेला पुढे नेण्याचे कर्तव्य करा, बाकी काही करणे योग्य नाही. त्यांनी मला सांगितले की राष्ट्रवादी-काँग्रेस आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमदारांना वाटते की आपण भाजपसोबत जावे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ज्या आमदारांना हे हवे आहे त्यांना माझ्याकडे आणा, असे मी त्यांना सांगितले. ज्या भाजपने आपल्या पक्षाची, माझ्या परिवाराची बदनामी केली, त्याच भाजपसोबत जाण्याचे तुम्ही बोलत आहात. असा प्रश्नच उद्भवत नाही. आमदारांना तिथे जायचे असेल तर ते सगळे जाऊ शकतात, मग ते आमदार असू दे नाहीतर आजून कोणी असू दे, ज्यांना जायच आहे त्यांनी मला सांगा आणि खुशाल जा.

ठाकरे म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आज आम्हाला साथ देत आहेत. शरद पवार आणि सोनिया गांधींनी आम्हाला साथ दिली पण आमच्याच लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. जे लोक जिंकू शकले नाहीत त्यांना आम्ही तिकिटे दिली आणि त्यांना विजयी केले. त्याच लोकांनी आमच्या पाठीत वार केले. दरम्यान, शिवसेनेने केलेल्या निलंबनाच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी महाराष्ट्राचे उपसभापती नरहरी झिरवाल हे उद्या शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांना नोटीस पाठवू शकतात. सोमवार, २७ जून रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-
बाळासाहेबांचं नाव वापरायचं नाही, हिंमत असेल तर स्वता:च्या बापाच्या नावावर मत मागून दाखवा; उद्धव ठाकरेंचे आव्हान
शरद पवार बनणार उद्धव ठाकरेंचे संकटमोचक बंडखोरांना परत आणायचा असा आखला प्लॅन
अखेर ठरलं! एकनाथ शिंदे आपल्या गटाला देणार हे अनोखं नाव, नाव वाचून उद्धव ठाकरेही टेंशनमध्ये जातील
उद्धव ठाकरेंची फक्त खुर्ची जाणार पण शिवसेनेच्या बंडाचा फटका काँग्रेसला बसणार, जाणून घ्या कसा?

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now