एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले होते. त्यांनी आता भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्रिपदही मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर अनेक टीका करण्यात आल्या आहे. तसेच काहींनी त्यांना बंडखोर आणि गद्दार सुद्धा म्हटले होते. (eknath shinde warning uddhav thackeray)
आता एकनाथ शिंदे यांनी सर्वांना उत्तर दिले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर सिनेमा काढला. तुम्हाला आवडला, पण काही लोकांना तो पचला नाही. त्याचाही राग माझ्यावर होता. कुणाला आवडो न आवडो मी त्याची पर्वा करत नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी बाळासाहेबांना मानलं. आज आम्ही त्यांचेच विचार पुढे घेऊन चाललो आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आम्ही हा निर्णय का घेतला याचं आत्मपरिक्षण करण्यापेक्षा आम्हाला बंडखोर, गद्दार म्हटलं जात आहे. हा बंड नाहीये, हा एक उठाव आहे, एक क्रांती आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेत्यांना सुनावलं आहे.
तसेच आम्ही घेतलेला निर्णय हा शिवसेनेला, शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आहे. आम्ही घेतलेला निर्णय लोकांनी मान्य केला आहे. जेव्हापासून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून शेकडो लोक पाठिंबा द्यायला येताय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आम्ही रक्ताचं पाणी करुन, जिवाचं रान करुन शिवसेना वाढवली. आम्ही जेल भोगलीये. १०० हून अधिक केसेस अंगावर घेतल्यात. धर्मवीर आनंद दिघेंनी ठाणे, पालघर जिल्ह्यात इतिहास घडवला. दिघेंनी उद्ध्वस्त होणाऱ्यांचं आयुष्य वाचवलं आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच १५ दिवसांच्या त्या अनुभवावर एक चित्रपट सुद्धा निघू शकतो. चर्चेसाठी आमच्याकडे माणसं पाठवली. तर इकडे आमचे पुतळे जाळले. पदावरुन आम्हाला हटवलं. दगडफेक करायला सांगितलं पण एकनाथ शिंदेंच्या घरावर दगड कोण फेकणार? शिंदेने मधमाशीसारखी माणसं गोळा केली आहे, ती सोडली तर पळताभुई थोडी होईल, असे म्हणत शिंदेंनी एकप्रकारे ठाकरेंना इशाराही दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
नाशिकच्या सुफी बाबाच्या हत्येचे खरे कारण आले समोर; धार्मिक नाही, तर ‘या’ कारणामुळे केली होती हत्या
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची घेतली भेट; मोठी राजकीय घडामोड घडणार
‘सलमानने मला लग्नासाठी विचारलं तर मी नाही म्हणणार नाही’, अभिनेत्रीचं हैराण करणारं वक्तव्य