शिवसेना जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे महाराष्ट्र राजकारणात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे.
शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी तर आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन पानी पत्र लिहून खळबळजनक आरोप केले आहेत. तर आता शिंदे यांनी शिरसाट यांचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमधून शिरसाट हे नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1539981459959664640?s=20&t=8RtVQMDY1ZOsuhDUK1NQpg
वाचा काय आहे व्हिडिओमध्ये.. ‘तुम्ही आम्हाला बंडखोर म्हणू शकत नाहीत आम्ही कोणतीही चूक केली नाही, बाळासाहेबांनी सांगितलं होतं की अन्याय झाल्यास बंड करा म्हणून, तुम्हाला मनातून आमचा अभिमान वाटत असेल,’ असं शिरसाठ यांनी या व्हिडिओत म्हंटलं आहे.
तसेच ‘आमची भूमिका तुम्हाला पटत नसेल पण तुम्ही मनातून आमच्या सोबत असाल, आम्हाला फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस नको आहे त्यासाठी आम्ही लढत आहोत,’ असही शिरसाठ यांनी या व्हिडिओत म्हंटलं आहे. सध्या शिरसाठ यांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतं आहे.
दरम्यान, “काल तुम्ही वर्षा सोडलं, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी तुमच्यावर फुलांची उधळण केली पण खरं तर लोकांना या गोष्टीचं दु:ख झालं पाहिजे होतं. येताना स्वागत करायला पाहिजे जाताना नाही,’ असं देखील शिरसाठ यांनी म्हंटलं आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटात सामील झालेले शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी तर आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन पानी पत्र लिहून खळबळजनक आरोप केले आहेत. तर दुसरीकडे एका सामान्य शिवसैनिकाने शिरसाठ यांना पत्र लिहिले असून खळबळजनक आरोप केले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
विधानसभेच्या प्रांगणात याल तेव्हा इथे आसामचे नेते येणार नाहीत; पवारांची बंडखोरांना थेट धमकी
ईडी-आयकरपासून वाचण्यासाठी शिवसेना आमदार-खासदार शिंदेंच्या गटात, धक्कादायक माहिती आली समोर
बंडखोरांना किंमत मोजावी लागेल; शरद पवारांचा शिवसेना आमदारांना इशारा