Share

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यावर शिंदेंनी पहील्यांदाच दिली प्रतिक्रीया, म्हणाले आमचा फोकस..

शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंडखोरी केल्यापासून राजकारणात खळबळ माजली होती. बरेच दिवस चाललेला हा खेळ बुधवारी संपला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबूक लाईव्हवर राजीनामा देण्याची घोषणा केली.

यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला आणि येतानाही अनपेक्षितपणे आलो होतो आणि जातानाही अनपेक्षितपणे जात आहे असं सांगत राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या नेत्यांसह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केला.

उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, अजय चौधरी, निलम गोऱ्हे इ. नेते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गट भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. या सर्व गोष्टींवर आता एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, भाजसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीची चर्चा झाली नाही, लवकरच होईल.

तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यांवर विश्वास ठेऊ नका. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट केले आहे की, वंदनीय हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस.

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदेंचे हे पहिले ट्विट आहे. सध्या ते मुंबईला येण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मी राज्यपालांची भेट घेण्यास चाललो आहे. त्यांची भेट घेतल्यानंतर मी देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे.

यावेळी ते असेही म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा कसलाही आनंद नाही उलट दुखच आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळीमुळेच कोसळले. त्यानंतर पुढील एक दोन दिवसात फडणवीसांचा शपथविधी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रीमंडळ कसे असेल याचीही चर्चा सध्या रंगली आहे.

https://twitter.com/mieknathshinde/status/1542376506458263552?s=20&t=WQQFpr8D308yvfRC811g5g

https://twitter.com/mieknathshinde/status/1542376363960971264?s=20&t=WQQFpr8D308yvfRC811g5g

महत्वाच्या बातम्या
शिंदेगटातील ‘या’ आमदारांना मिळणार मंत्रीपदी संधी, जाणून घ्या नव्या मंत्र्यांची यादी
फडणवीस मंत्रीमंडळाची संभाव्य यादी आली समोर; पहा कुणाकुणाची लागणार मंत्रीपदी वर्णी
महाविकास आघाडी सरकार कोसळताच बच्चू कडूंची फाईल बंद, रस्ते घोटाळ्यात क्लीन चिट
काॅंग्रेस राष्ट्रवादीमुळे नाही, तर ‘या’ गोष्टीचा राग शिंदेंच्या डोक्यात होता, त्यामुळे त्यांनी बंड केलं

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now