एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान, भरत गोगावलेंची पक्ष प्रतोदपदी निवड केल्याचं केलं जाहीर
मोठी बातमी! शिवसेनेने दिलेले आदेश अवैध म्हणत एकनाथ शिंदेंनी स्वत:च केली ‘ही’ घोषणा
सध्या राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेनेमध्ये अंतर्गत संघर्ष पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे मागे हटायला तयार नाहीत. त्यांनी आता पुन्हा थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे. सध्या त्यांनी केलेल्या ट्विटने खळबळ उडाली आहे. त्यांनी शिवसेनेने दिलेले आदेश अवैध सांगितले आहेत.
शिवसेना पक्ष प्रतोदपदी आता आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. याआधी शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी एक आदेश काढला होता. तो आदेश अवैध असल्याचं सांगत एकनाथ शिंदेंनी एक ट्विट केले आहे.
दुसरीकडे बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने ऍक्शन घेण्यास सुरूवात केली आहे. बैठकीला हजर न राहिल्यास त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. पक्षाकडून त्यांना असं पत्र पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना हे पत्र आलं आहे. हे पत्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या पत्रातून आमदारांना इशारा देण्यात आला आहे की, जर बैठकीला उपस्थित राहिला नाहीत तर थेट कारवाई केली जाईल.
शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनिल प्रभू यांनी हे पत्र जारी केलं आहे. पण हा आदेश वैध नाही असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विधिमंडळाच्या मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची निवड केली आहे. त्यांनी याबद्दल ट्विट केले आहे आणि सांगितले आहे की, आमदारांच्या बैठकीबाबत काढलेले आदेश हे बेकायदेशीर आणि अवैध आहेत, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, आता आमदारांचे हे बंडाचे लोण आता खासदारांपर्यंत येवून पोहोचले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता शिवसेनेच्या खासदारांमधूनही अशाप्रकारची मागणी होऊ लागली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता शिवसेनेचे खासदार ही बंडाच्या तयारीत असल्याच बोललं जातं आहे.
मुख्यमंत्री पदावरून भाजप – सेना यांची युती तुटली. अन् शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या सोबतीने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र तेव्हापासून भाजप राज्य सरकारवर सडकून टीका करत आहे. सत्ताधारी नेत्यांवर ईडीचा ससेमिरा लावला जात आहे.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
महत्वाच्या बातम्या
अखेर बंडखोर शिवसेना आमदाराने सांगितले नाराजीचे खरे कारण; जाणून घ्या…
उद्धवजींनी सांगितल्यास ७ व्या मजल्यावरून उडी मारू, म्हणणारे मंत्री आज शिंदेंच्या सोबत
शरद पवारांनाही भेटीसाठी वेळ देत नव्हते उद्धव ठाकरे, त्यानंतर शरद पवारांनी दिला होता ‘हा’ इशारा
SID ने दोन महिन्यांपुर्वीच सरकारला दिली होती एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची पुर्वकल्पना, पण…