याचबाबत मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्विकारताच एकनाथ शिंदेंनी सर्वसामान्यांसाठी उचललं मोठं पाऊल आहे. यामुळे आता नागरिकांना दिलासा मिळणार असल्याच बोललं क जातं आहे. नुकतीच शिंदे यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे.
याचबरोबर ‘महाराष्ट्र राज्यांचं सर्वांगिन काम करणारं सरकार आपण चालवू. केंद्र सरकारचीही मदत घेऊ. आणि राज्याला सुजलाम सुफलाम करू. आम्हाला कधीही ग ची बाधा होऊ देणार नाही,’ असा शब्द देखील यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे चांगलेच कामाला लागले असून त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देखील दिले आहेत. राज्यात अलीकडे पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून शिंदे हे स्वतः NDRF जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत
याचबरोबर रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सध्या राज्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पडण्याची शक्यता? देवेंद्र फडणवीस शरद पवारांसोबतही करणार खेळी
पैलवानांच्या तक्रारी आल्यानंतर भारतीय कुस्तीगीर संघटनेची मोठी कारवाई, शरद पवारांना धक्का
मविआ सरकार पडताच शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस; सूड घ्यायला सुरवात?
उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवून सगळी जबाबदारी एकनाथ शिंदेंला दिली त्याचा हा परिणाम- शरद पवार