शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. ते सोमवारपासूनच नॉट रिचेबल झाले होते. शिंदे सध्या गुजरातच्या सुरतमध्ये असून त्यांच्यासोबत ३० आमदारही आहे. हा शिवसेनेसह महाविकास आघाडीलाही मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. (eknath shinde talk with rashmi thackeray)
अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे गुजरातला असले तरी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संपर्कात आहे. मी किंवा एकही आमदार फुटणार नाही. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. माझ्यावर विश्वास ठेवा, असे शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंना सांगितले आहे.
तसेच शिवसेनेतीली नाराजीसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधील मतभेदामुळे आपण हा आक्रमक पवित्रा घेतल्याची कबुली शिंदे यांनी दिली आहे. आमदारांना घेऊन मी कोणासोबत कुठे जाणार नाही. तसेच भूमिका मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबियांना सांगितले आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांना घेऊन सुरतमध्ये दाखल झाले होते. ते फक्त सुरतच्या हॉटेलमध्ये आहे, त्यामुळे ते भाजपशी चर्चा करणार आहे, असे म्हटले जात आहे. पण प्रत्यक्षात मात्र गेल्या १० तासांपासून शिंदे यांनी अनेकदा उद्धव ठकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे.
तसेच आपण शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, असेही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबियांना सांगितले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आले आहे. त्यामुळे आता मिलिंद नार्वेकर त्यांचे मन वळवू शकतील का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा धक्का; शिंदेंबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
महाविकास आघाडी सरकार कोसळणार? शिवसेनेनंतर काँग्रेसचे पाच आमदारही नॉट रिचेबल
“आईचे दूध विकणारा नराधाम मला शिवसेनेत नकोय”, मुख्यमंत्र्यांचा टोमणा एकनाथ शिंदेंनी स्वतःवर घेतला?