eknath shinde sharing incident uddhav thackeray | भाजपसोबतची कित्येक वर्षांची युती तोडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केली होती. तसेच त्यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. पण त्यानंतर शिवसेना नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसत होती. अखेर एकनाथ शिंदे ४० आमदार घेऊन सरकारमधून बाहेर पडले होते.
त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले आहे. भाजप हे शिवसेनेचा नैसर्गिक मित्र आहे असे शिंदे गटातील नेते म्हणताना दिसून येतात. तसेच उद्धव ठाकरेंनाही शिवसेनेच्या काही नेत्यांनी पुन्हा भाजपसोबत युती करुन असे सांगितले होते. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना नकार दिला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच याबाबतचा एक किस्सा सांगितला आहे.
भाजप हा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र आहे, असे मी उद्धव ठाकरे साहेबांना सांगितले होते. तसेच उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत आपण युती करुन घेऊ यासाठी तयार करण्याचाही प्रयत्न केला होता. पण त्यांनी ते ऐकलं नाही, ते मला नाही बोलले होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, हे कसं झालं, का झालं हे महाराष्ट्राच्य जनतेला माहिती आहे. शिवसेनेने भाजपसोबत निवडणूक लढवली होती. तसेच जनतेने भाजप-शिवसेनेच्या युतीला निवडून दिले. पण जनतेच्या मनाविरुद्ध महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली. या सरकारला आमदारांनी सुद्धा विरोध केला होता.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या मतदार संघात कामे व्हावीत असे प्रत्येक आमदाराला वाटत होतं. जनतेने सुद्धा त्यांना निवडून दिले होते. पण आमच्या आमदारांना आमचंच सरकार असताना न्याय मिळत नव्हता. मी उद्धव ठाकरेंना समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण आमच्या प्रयत्नांना यश आले नाही.
तसेच आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती आहे. भाजप-शिवसेनेचे सरकार महाराष्ट्रात यावे ही जनतेची इच्छा होती. तसेच बाळासाहेबांची सुद्धा हिच इच्छा होती. त्यामुळे हे सरकार आलं. आम्ही बंड केलं, पण ते मुख्यमंत्रिपदासाठी केलेलं नाही, तर वैचारिक बांधिलकीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Arshdeep Singh : अर्शदीपने खुलं केलं वर्ल्डकपमधील यशामागचं रहस्य; महाराष्ट्राच्या ‘या’ सुपुत्राला दिले क्रेडीट
Amruta Fadanvis : ‘कोणत्या महीलेनं कसं जगाव हे तुम्ही सांगू नका’; भिडेंच्या कुंकवाच्या वक्तव्यानंतर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या
ncp : पवार रुग्णालयात ॲडमीट असतानाच राष्ट्रवादीत खळबळ; दोन जवळच्या व्यक्तींनी सोडली साथ