राजकीय वर्तुळासह राज्यात देखील सध्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या गुवाहाटीत बंडखोर आमदारांच्या बैठकांचे सत्र जोरात सुरू आहे. नुकतच शिंदे यांनी आपल्या सोबत आलेल्या आमदारांशी संवाद साधताना एक मोठं व्यक्तव्य केलं होतं.
मात्र नंतर एकनाथ शिंदे यांनी पलटी मारल्याच पाहायला मिळालं आहे. ‘आपल्या पाठिशी महाशक्ती आहे. त्यांनी पाकिस्तानला वठणीवर आणले. आपल्याला काहीही कमी पडणार नाही. आपले सर्वाचे सुखदु:ख आता एकच असून, सारे एकजुटीने राहू’’, असे आवाहन शिंदे यांनी गुवाहाटीत आपल्या गटातील आमदारांच्या बैठकीत केले होते.
मात्र याबाबत माध्यमांनी शिंदे यांना विचारलं असता शिंदे यांनी सारवासारव करत वेगळेच स्पष्टीकरण दिल्याचे पाहायला मिळाले. ‘मी एक मोठी शक्ती आपल्याला साथ देत आहे असे म्हटले तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची शक्ती असे म्हणायचे होते, असे एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे म्हणाले.
तर दुसरीकडे आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक चांगलेच तापले आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन करत आहे. अशात काही शिवसैनिक हे बंडखोर आमदारांवर खुपच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता शिवसैनिकांनी बंडखोर आमदार मंगेश कुडाळकर यांचे ऑफिस फोडले.
कुर्ला येथील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर एकनाथ शिंदे गटात सामील झाले होते. याआधी त्यांनीच बंडखोर आमदारांवर टीका केली होती. तसेच जेव्हा शिवसेनेच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची निवड झाली तेव्हा ते मुंबईतच होते, पण त्यानंतर ते शिंदे गटात सामील झाले.
सध्या याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी शिवसैनिकांनी मंगेश कुडाळकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. तसेच मंगेश कुडाळकर विरोधात शिवसैनिकांकडून पोस्टर तयार करून या पोस्टरवर गद्दार मंगेश कुडाळकर असे लिहिण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘राजकारणाचे डावपेच चालूच राहतील, पण राज्यकारभार थांबायला नको, जनतेची कामं थेट माझ्याकडे आणा’- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘संकटाच्या काळात पक्षाने विचारपूसही केली नाही’; आमदार यामिनी जाधवांनी व्यक्त केली खंत
मोदी सरकार महाराष्ट्राचे दोन तुकडे करणार; भाजपच्या बड्या मंत्र्यानेच केला गौप्यस्फोट
आम्ही मरेपर्यंत शिवसैनिक राहणार, काहीही झालं तरी शिवसेना सोडणार नाही; शिंदे गटातील आमदाराचा व्हिडीओतून संदेश