अनेक दिवसांपासून नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये आहे. शिंदेंसह जवळपास शिवसेनेचे ३० आमदार गुजरातच्या सुरतमध्ये रातोरात दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशातच शिवसेनेने मोठं पाऊल उचलल आहे.
शिवसेनेने मोठं पाऊल उचलतं एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी केली आहे. तर शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आल्याची सध्या हाती येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून शिंदे यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नसल्याच बोलले जात आहे.
तर दुसरीकडे अशातच एकनाथ शिंदे यांनी एक सूचक ट्विट केले आहे. बंडखोरीनंतर त्यांचे पहिले ट्विट आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, तसेच बाळासाहेबांनीच आपल्याला हिंदुत्वाची शिकवण दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमधून असे लक्षात येत आहे की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे सरकार मान्य नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी इच्छाही त्यांची दिसत असल्याचे ट्विटमधून लक्षात येत आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी शिवसेनेकडून काल रात्रीपासूनच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप संपर्क होऊ शकला नाही.
महत्वाच्या बातम्या=
सत्तेसाठी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी अवलाद…; एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना आक्रमक
राऊतांच्या त्या आरोपांनी शिवसेना येणार गोत्यात; अपक्ष आमदार एकत्र येत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत?
शिवसेना महाविकास आघाडीतील ढ टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले मनसेचा खोचक टोला
राज्यसभेतील पराभवापाठोपाठ शिवसेना आणखी गोत्यात; ‘या’ आमदाराची आमदारकी रद्द होणार