उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित होत होता? एकनाथ शिंदेंनी आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर ते भाजपसोबत जातील हे तर आधीच ठरलं होतं पण सगळ्यांना वाटत होतं की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील.
आज स्वता देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं की, एकनाथ शिंदेंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील. देवेंद्र फडणवीस स्वता मंत्रिमंडळातून बाहेर राहणार आहेत. या सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपाचे मंत्री सहभागी असतील असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी यावर आपली प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, आमदारांच्या मदतदारसंघातील विकासकामे आणि राज्याचा विकास हा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आहोत. शिवसेना पक्ष म्हणून आणि इतर पक्ष असे 50 आमदार आम्ही एकत्र आहोत. वैचारिक भूमिका, राज्याचा विकास आणि अडीच वर्षांपुर्वी जे घडलं आहे त्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.
गेल्या काही काळात आम्ही मुख्यमंत्री महोदयांना मतदारसंघातील समस्या, विकासप्रकल्प, अडचणी, याबाबत वारंवार माहिती दिली होती. आतापर्यंत विरोधकांकडून सत्तेकडे जाताना तुम्ही पाहिलं असेल पण आता सत्तेतून विरोधकांकडे आम्ही गेलो आहोत. मीही मंत्री होतो पण राज्याच्या भविष्याच्या दृष्टीने जे घडत होते ये योग्य नव्हते.
काही निर्णय आघाडीत घेता येत नव्हते. आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेऊन गेल्यानंतर काही निर्णय झाले. पण हे पुर्वीच व्हायला हवे होते. या आमदारांच्या मतदारसंघातील प्रश्न मला सांगितल्यावर हा निर्णय मला घ्यावा लागला. राज्याच्या विकासासाठी, जनतेच्या मनातील अपेक्षांसाठी हा निर्णय घेतला.
फडणवीसांबद्दल बोलताना ते म्हणाले की, आज फडणवीसांकडे 120 संख्याबळ आहे. असं असतानाही मुख्यमंत्रिपद ते घेऊ शकले असते. परंतु त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला पाठिंबा दिला. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, फडणवीसांचे मनापासून आभार मानतो. ही ऐतिहासिक घटना आहे. जे काही घडलं ते वास्तव आपल्यासमोर आहे.
राज्यातील जनतेच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र एक करू. फडणवीस आमच्या पाठिशी आहेत. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस पाहायला मिळत नाही. आजकालच्या राजकारणात काय होईल, हे आपण पाहत असतो. पण काही मिळत असताना त्यांनी उदारता दाखवली आहे ती दुर्मिळ आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! बाळासाहेबांचे स्वप्न पुर्ण करत शिवसैनिकाला केले मुख्यमंत्री, स्वत: मात्र…
रिक्षा चालक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जाणून एकनाथ शिंदे यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास
सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या जल्लोषावर बंडखोर संतापले, म्हणाले, ‘यामध्ये उद्धव ठाकरे कुठेही…’
तुमच्यामुळे राज्यात जातीय दंगली झाल्या नाहीत…, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीकडून ठाकरेंचे कौतूक