एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने अखेर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्ता स्थापन करताना दिसून येत आहे. भाजपसोबत सरकार स्थापन करताना त्यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती, पण देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास खुप संघर्षमय होता, आता आपण त्याच्याच बद्दल जाणून घेणार आहोत. (eknath shinde politics career)
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल लोकांना खूप माहिती आहे, परंतु त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव संभाजी नवलू शिंदे होते. काही वर्षांनी त्यांचे कुटुंब साताऱ्याहून मुंबईजवळ ठाण्यात आले. सुरुवातीच्या काळात एकनाथ शिंदे ऑटो चालवायचे.
शिंदे जेव्हा त्यांच्या कारकिर्दीत ऑटो चालवत असत, तेव्हा ते १९८० च्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे आणि ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. आनंद दिघे यांनी त्यांना शिवसेनेत येण्यासाठी मदत केली. जून २००० मध्ये, एकनाथ शिंदे त्यांचा ११ वर्षांचा मुलगा दिपेश आणि ७ वर्षांची मुलगी शुभदा यांच्यासह मुंबईहून सातारा येथे आले.
तेथे बोटिंग करत असताना झालेल्या अपघातात त्यांची दोन्ही मुले बुडाली. एकनाथ शिंदे यांचा विवाह लता शिंदे या व्यावसायिक महिलेशी झाला. त्यांना श्रीकांत शिंदे नावाचा मुलगा आहे. श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत. यासोबतच ते ऑर्थोपेडिक सर्जन देखील आहेत. श्रीकांतने कळव्यातील शिवाजी रुग्णालयातही दोन वर्षे काम केले आहे.
श्रीकांतने २०१६ मध्ये वृषाली शिंदेसोबत लग्न केले. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर ते २००४ मध्ये ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर त्यांनी ठाण्यात वर्चस्व राखले आणि सलग चार विधानसभा निवडणुका जिंकल्या. २०१४ मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.
महत्वाच्या बातम्या-
‘हा माझा हिंदुस्थान आहे, इथे हिंदूंचा जीव महत्वाचा आहे’, उदयपूर घटनेवरून कुस्तीपटू बबिता फोगट संतापली
VIDEO: तारक मेहता का उलटा चष्माला मिळाले नवीन नट्टू काका, येताच म्हणाले, माझा पगार कधी वाढवणार?
बिहारमध्ये नितीश-तेजस्वी करणार मोठा गेम, भाजपची वाढली अस्वस्थता, आकडेवारीवरून समजून घ्या