Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कधी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार; म्हणाले…

Eknath Shinde

राज्यात आता शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले आहे. या नवीन सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेत काही महत्वाचे निर्णय सुद्धा घेतले आहे. पण १५ दिवस झाले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झालेला नाही, त्यामुळे विरोधी पक्षातील नेते त्यांच्यावर टीका करताना दिसून येत आहे. (eknath shinde on cabinet ministers)

अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर उत्तर दिले आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन झाले असून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. पण असे असले तरी कामं थांबलेली नाही. लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, विरोधकांना जे वाटत आहे तसे नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यमंत्रिमंडळाची एक बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आणि घेतलेल्या निर्णयांबाबत भाष्य केले आहे.

संजय राऊत काय बोलतात, त्यावर मला बोलण्याची गरज नाही. रोज सकाळी उठून ते तेच काम करत असतात. राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याची पाहणी आम्ही करत आहोत. शेजारील राज्यांशी आम्ही बोलत आहोत. कुणी पुरात अडकू नये याची खबरदारी आम्ही घेत आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दर आम्ही कमी केले आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना कर्ज सवलत दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचाही विस्तार आम्ही लवकरच करु. विरोधकांना जसं वाटत आहे, तसं काही नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव लोकनेते दी बा पाटील असे करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मंत्रिमंडळाचा विस्तार नंतर करा, आधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा’, बच्चू कडूंनी टोचले सरकारचे कान
“दोन वाडपे जर व्यवस्थित वाढत असतील, तर ४० जणांची गरज काय?”, सदाभाऊ खोत यांच्या भाषणाची चर्चा
गौतम अदानी बनले जगातले चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्सनाही टाकले मागे

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now