शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत मोठी बंडखोरी केली आहे. मंगळवारी दिवसभर ते गुजरातला होते. त्यानंतर ते आसामला रवाना झाले. सध्या ते आसामच्या एका हॉटेलमध्ये थांबलेले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचेही म्हटले जात आहे. (eknath shinde new tweet abou ncp and congress)
एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच एकनाथ शिंदेंमुळे महाविकास आघाडीचे सरकारही धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत केलेल्या युतीमुळे नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी असलेली युती तोडावी आणि भाजपशी युती करावी अशी मागणी एकनाथ शिंदे करताना दिसत आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर आपल्याला उपमुख्यमंत्री करावे अशी मागणी केल्याचेही म्हटले जात होते.
आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशा आशयाचे ट्विट केले आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1539619628770807809
गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे-शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे, महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, असे एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या ३५ पेक्षा जास्त आमदारांनीही आपल्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतचे सरकार मान्य नसल्याचे स्पष्ट केले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये नेतृत्व शिवसेना करत असली तरीही फायदा मात्र घटकपक्ष घेत असल्याचे आमदारांनी म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या-
महाविकास आघाडीला वाचवण्यासाठी काँग्रेसने बदलली भूमिका; म्हणाले, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा
आमदारांची ‘ही’ मागणी शरद पवारांनी मान्य केल्यास एकनाथ शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का
“पवारसाहेब जोपर्यंत आखाड्यात आहेत, तोपर्यंत भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही”