सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. शिंदे यांच्या बंडामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. ३० जून रोजी बहुमत चाचणीचे आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर आता शिंदे गट मतदानासाठी मुंबईत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
विरोधी पक्ष भाजपाने केलेली मागणी राज्यपालांनी मान्य करत राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.
आज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर आता शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेलवरून रवाना झाले आहेत. सुमारे तीन तासांच्या प्रवासानंतर ते गोव्यात दाखल होणार आहेत. तसेच सर्व बंडखोर आमदार गुरुवारी म्हणजेच उदय मुंबईत येणार असल्याची माहिती खुद्द शिदे यांनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर सध्या आमदारांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच यासाठी भाजप आणि शिंदे समर्थकांनी प्लॅनिंग केल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या महितीनुसार, या प्लॅनिंगमध्ये गोवा आणि मुंबई विमानतळासोबतच राजभवनाच्या हेलिपॉडचाही यामध्ये समावेश आहे.
दरम्यान, आता आणखी एक नवीन प्लॅनिंग समोर येत आहे. मिळालेल्या महितीनुसार, आमदार मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना विमानतळावरून थेट हेलिकॉप्टरने राजभवनात उतरवलं जाणार आहे. राजभवन ते विधान भवनापर्यंत शिंदे समर्थक मानवी साखळी करणार असून आमदारांना सुरक्षित पोहोचवण्यात येणार असल्याच देखील बोललं जातं आहे.
तर दुसरीकडे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केलेला बंड चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. शिंदे यांच्या बंडामुळे अख्ख महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. ३० जून रोजी बहुमत चाचणीचे आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर आता शिंदे गट मतदानासाठी मुंबईत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
महत्वाच्या बातम्या-
कालीन भैयाच्या सुनेनं बिकीनी घालून पाण्यात लावली आग, फोटो पाहून तुमचेही उडतील होश
आतापर्यंत जगापासून लपलेले आहे कामाख्या मंदिराचे ‘हे’ रहस्य, वाचून तुम्हालाही बसणार नाही विश्वास
उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! पुण्यातील ‘हा’ माजी मंत्रीही होणार शिंदे गटात सामील