शिंदेंच्या बंडामागे भाजपचा हात असल्याचे झाले स्पष्ट, धक्कादायक माहिती आली समोर

शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सध्या सर्व आमदार आसामच्या गुवाहटीमध्ये आहेत. (eknath shinde mla get modi govenrments security)

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याभरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. बंडखोर आमदांचे पोस्टर फाडण्यात आले आहे. तसेच त्यांचे ऑफिसही फोडण्यात आले आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या घरावरही हल्ले होण्याची शक्यता आहे.

असे असताना आता एका हैराण करणारी माहिती समोर आली आहे. बंडखोर आमदारांना आता थेट केंद्राने सुरक्षा पुरवली आहे. शिंदे गटातील १५ आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यामुळे या बंडात भाजपचा सुद्धा समावेश असल्याची चर्चा रंगली आहे.

आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात कऱण्यात आले आहे. तसेच त्यांच्या घराला सगळीकडून बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहे. काल शिंदे गटातील १५ आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृहसचिव आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर लगेचच हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या शिवसैनिक खुप आक्रमक झालेले आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या ऑफिसची तोडफोड केली होती. त्यानंतर केंद्राने शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरवली आहे. आज संध्याकाळपर्यंत त्या १५ आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात होणार आहे, असे म्हटले जात आहे.

सदा सरवणकर यांच्यासोबतच वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यालयाला आणि घराला सुद्धा केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाल्याने या बंडामागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
गुवाहाटीतून ४० आमदारांचे मृतदेह येतील; संजय राऊतांच्या वक्तव्याने उडाली खळबळ
शिंदे गटातच सुरू झालाय अंतर्गत वाद, लवकरच परतीच्या वाटेवर निघणार सगळे बंडखोर
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, उद्धव ठाकरेंची गुंडागिरी संपवावी, नवनीत राणांची मागणी