थेट महाविकास आघाडी सरकार धोक्यात आणणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आता मात्र अडचणीत सापडले आहेत. अभिजित खेडेकर, डॉ. अभिषेक हरदास आणि समीर शेख यांनी शिंदे यांच्या विरोधात एक याचिका दाखल केली आहे. पुण्यातील प्रथमवर्ग न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे ते वाचवण्यासाठी शिवसेना नेत्यांचे प्रयत्न सुरु आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
असे असलं तरी देखील नेते एकनाथ शिंदे आता पुरते अडचणीत सापडले आहेत. गाड्यांच्या किंमतीसह शेतजमीन लपवल्याचा आरोप शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी शिंदे यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर अद्याप शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
वाचा नेमकं एकनाथ शिंदेंच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेमद्धे… शिंदे यांनी २०१४ आणि २०१९ साली निवडणुकीचा अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वाहने, मालमत्ता आणि शैक्षणिक माहितीमध्ये तफावत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. यामुळे शिंदे आता अडचणीत आले आहेत.
याचबरोबर शिंदे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असणारी शेतजमीन आणि इमारतीची माहितीही लपवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. शिंदे यांनी २०१४ च्या शपथपत्रामध्ये आरमाडा गाडी ८ लाख रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. मात्र, २०१९ च्या निवडणूक पत्रामध्ये हीच आरमाडा ९६ हजार ७२० रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे.
शिंदे यांनी २०१४च्या निवडणूक शपथपत्रात स्कॉर्पिओ ११ लाख रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले आहे. मात्र, २०१९च्या शपथपत्रामध्ये तीच गाडी अवघ्या लाख ३३ हजार रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे. २०१४ च्या शपथपत्रात बोलेरो ६ लाख ९६ हजार ३७० रुपयांना, तर तीच गाडी ८९ हजार ७५० रुपयांना खरेदी केल्याचे २०१९ च्या शपथपत्रात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
स्विमिंग करताना वाजवायचे माऊथ ऑर्गन, सोड्याच्या बाटलीपासून बनवायचे संगीत, वाचा आरडी बर्मन यांच्याबद्दल..
चित्रपटसृष्टीवर शोककळा! राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह
उद्योगक्षेत्रातून धक्कादायक बातमी! मुकेश अंबानींनी तडकाफडकी दिला रिलायन्सचा राजीनामा
‘या’ 10 बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या आधीच होत्या प्रेग्नेंट, एक तर लग्न न करताच झाली होती आई