शिवसेनेच्या अडचणी काही केल्या थांबण्याच नाव घेत नाहीये. एकीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगत आहे. सध्या राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
यातून कुठलाच मार्ग निघत नसल्याने पेच आणखी वाढत आहे. पण आता लवकरच हे सगळं बंद होईल अशी माहिती समोर आली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बंडखोरीचा मुहूर्त हुकल्याने सर्व फुटलेले आमदार परतीच्या वाटेवर येऊ शकतात. एकनाथ शिंदेंच्या अध्यान्मिक गुरूंनी मंगळवारी असलेल्या अमावस्येच्या आतच सत्तास्थापनेसाठी मुहूर्त असल्याचे सुचित केले होते. पण या मुहूर्ताला सत्तास्थापना करणे अवघड आहे.
शिंदे यांना २८ जूनच्या आतच हा बंड यशस्वी करायचा होता अशी माहिती मिळाली आहे. मुहूर्ताच्या आतच बंडखोर आमदारांमध्ये वादावादी सुरू झाल्याने हा बंड यशस्वी होणार नसल्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडी तसेच शिवसेना मोठा बंडामुळे गुडघे टेकतील असा शिंदे यांचा अंदाज खोटा ठरला.
उलट बंडखोरच कायद्याच्या कात्रीत सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे बंड आता इथच थांबवावे आणि परतीच्या वाटेला निघावे अशी स्थिती आमदारांमध्ये निर्माण झाली आहे. फुटीर आमदारांना फक्त ३ दिवस बाहेर थांबावे लागेल असे सांगण्यात आले होते. पण त्यानंतर पाच दिवस झाले तरी सत्तास्थापनेची काहीच चिन्हे दिसत नसल्याने आमदारांमध्ये वाद सुरू झाला आहे.
त्यांना घरी येण्याची घाई सुरू झाली आहे. त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. दिवसावर दिवस वाढत चालल्याने त्यांचा संयम सुटत चालला आहे. काही आमदारांमध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आपल्याला चुकीची माहिती दिली, काही लोकांनी चौकशीच्या फेऱ्यातून वाचवण्यासाठी आपली दिशाभूल केली, आपल्याला फसविले गेले आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
ठाकरे सरकार कोसळणार! चंद्रकांतदादांनी दिले सत्तास्थापनेचे स्पष्ट संकेत; वाचा काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंच्या गटात होणार बंड; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याने टाकला मोठा डाव
मी एकनाथ शिंदेंचा पठ्ठा, तिकडे आल्यावर तुम्हाला पळता भुई थोडी करू; बंडखोराने फोडली डरकाळी
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, उद्धव ठाकरेंची गुंडागिरी संपवावी, नवनीत राणांची मागणी