Share

‘या’ कारणामुळे २ महिन्यातच मुख्यमंत्री शिंदेंना वैतागले अधिकारी; वाचा नेमकं असं काय घडलं?

eknath shinde cm
भाजप – शिंदे सरकार राज्यात सत्तेत येऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या दोन महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं – मोठे निर्णय घेतले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून शिंदे हे अॅक्शनमोड मध्ये पाहायला मिळतं आहेत. बैठकांचे सत्र देखील जोरदार सुरू आहे.

शिंदे सध्या राज्यातील प्रत्येक ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अख्खा महाराष्ट्र जवळपास पिंजून काढला आहे. तर आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचे सत्र जोरात सुरू आहे. यावरून असे लक्षात येते की, एकनाथ शिंदे हे चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

अशातच एक वेगळी बातमी समोर येतं आहे. अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंविरोधात तक्रारींचा पाढा वाचला आहे. अवघ्या दोनच महिन्यात मुख्यमंत्री शिंदे प्रोटोकॉल पाळत नसल्याने अधिकारी वर्ग त्रस्त झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे प्रोटोकॉल पाळत नसल्याने दोन महिन्यातच अधिकारी शिंदेंना वैतागले आहेत.

वाचा नेमकं काय अधिकाऱ्यांना काय वाटतंय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंच्या नियोजित दौऱ्याची कोणतीही माहिती मिळत नाही. याचबरोबर अनेकदा नियोजित दौऱ्यात परस्पर फेरफार केली जाते. या बदलाची माहिती पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनाही नसते.

याचा परिमाण असा होतो की, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनाही खूप वेळ ताटकळत उभं राहावं लागतं. याशिवाय मुख्यमंत्री शिंदे दिलेल्या वेळेत पोहोचत नाही. यामुळे पूर्ण वेळ अधिकाऱ्यांना काम करत बसावं लागतं. यामुळे आता अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याच बोललं जातं आहे.

दरम्यान, शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते चांगलेच चर्चेत आले आहे. शिंदे हे सातत्याने अपडेट राहण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या राज्याच्या राजकारणात शिंदे गट चांगलाच चर्चेत आहे. याशिवाय शिंदे गटातील नेते मंडळी देखील त्यांच्या व्यक्तव्याने चर्चेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now