Share

बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, सत्तेसाठी आम्ही कधीही…

शिवसेना नेते एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. त्यानंतर ते अचानक नॉट रिचेबल झाले होते. सध्या ते गुजरातमध्ये आहे. शिंदेंसह जवळपास शिवसेनेचे ३० आमदार गुजरातच्या सुरतमध्ये रातोरात दाखल झाल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (eknath shinde first tweet)

एकनाथ शिंदे यांचे हे बंड महाविकास आघाडी सरकारसाठी मोठा धक्का असू शकतो असे म्हटले जात आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क होत नसल्याचे म्हटले जात होते. पण त्यांच्याशी संपर्क झाला असून त्यांच्याशी चर्चा सुरु आहे.

अशातच एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. बंडखोरीनंतर त्यांचे पहिले ट्विट आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, तसेच बाळासाहेबांनीच आपल्याला हिंदुत्वाची शिकवण दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमधून असे लक्षात येत आहे की त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे सरकार मान्य नाही. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी इच्छाही त्यांची दिसत असल्याचे ट्विटमधून लक्षात येत आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड, संजय बांगर, आणि दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक प्रस्ताव दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी या प्रस्तावात केल्याचे म्हटले जात आहे.

तसेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असावेत आणि उपमुख्यमंत्री म्हणून आपली वर्णी लावावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या या प्रस्तावामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

महत्वाच्या बातम्या-
“आईचे दूध विकणारा नराधाम मला शिवसेनेत नकोय”, मुख्यमंत्र्यांचा टोमणा एकनाथ शिंदेंनी स्वतःवर घेतला?
एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिला प्रस्ताव, केल्या ‘या’ तीन महत्वाच्या मागण्या
कधीही कोसळू शकतं महाविकास आघाडी सरकार, क्रॉस व्होटिंग झाल्यानंतर वाचा नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now