शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत ते आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. गुरुवारी शिदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली.
तर आता नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधीची चर्चा रंगली आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ केव्हा तयार होणार? कॅबिनेटमध्ये कुणाची वर्णी लागणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होतं आहेत. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १२ किंवा १३ जुलैला होणार असल्याच बोललं जातं आहे.
तर आता शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला समोर आला आहे. याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व सामान्य प्रशासन खात असू शकतं. याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते असू शकते.
गृहखात्याबरोबरच अर्थखातेही फडणवीसांकडे जाणार असल्याच बोललं जातं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटातील माजी मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याच बोललं जातं आहे. शिंदे गटातील नऊ माजी मंत्र्यांपैकी एक किंवा दोन जणांना पुन्हा संधी न देण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटासोबतच भाजपाकडून दोघांना डावलण्यात येणार असल्याच समजत आहे. याच बरोबर भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्री पद दिल असल्या कारणाने शिंदे गटाला एक-दोन खाती कमी घेण्याचा आग्रह धरला जाऊ शकतो. मंत्रिपदे वाटून घेण्यात भाजपचा वाटा जास्त असल्याच बोललं जातं आहे.
साधारण, शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांसह १२ अपक्ष आमदार आहेत. यामुळे शिंदे गटाला साधारण १५ ते १७ मंत्रिपदे दिली जाऊ शकतात. तर भाजपाला २५ ते २७ मंत्रिपदे मिळतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनापूर्वीच होणार असल्याच बोललं जातं आहे.
याचबरोबर अधिवेशनाच्या आधीच नवीन मंत्री आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. तसेच दोन दिवसात भाजप आणि शिंदे गटात खाते वाटपावर चर्चा होणार असल्याच बोललं जातं आहे. आता सर्वांचे लक्ष शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली थेट पवारांची भेट; व्हायरल फोटोंमागील सत्य घ्या जाणून…
..तर आम्ही मातोश्रीवर परत जाऊ, बंडखोर आमदार संजय राठोडांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
‘मतदारसंघात येऊ द्या, आम्ही दांडे सोलून ठेवलेत’; महिला शिवसैनिकांचा बंडखोर आमदारांना इशारा
‘नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल त्याला मी माझं घर देईल’, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दर्ग्याच्या खादिमला अटक