गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू होता. अखेर तो आता संपला असून राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. (eknath shinde criticize uddhav thackeray)
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विरोधक त्यांच्यावर टीकाही करत आहे. अशात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे बैठका घेताना दिसून येत आहे. आज त्यांनी सेनाभवनात महिला आघाडीतील प्रमुख महिला नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला म्हटलं होतं.
काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, त्याला ब्रेक नव्हता, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता. तसेच काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचा माईक खेचला आहे, पुढे काय काय खेचतील माहित नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!#MaharashtraFirst
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022
आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडिजचा स्पीड फिका पडला आहे, कारण हे सर्व सर्वसामान्यांचं सरकार आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मोदींच्या लाटेत सामान्य माणूसच राजा होईल. हे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या लोकांनी समजून घ्यावं. आम्ही रिक्षावाले असू पान टपरीवाले असू, किंवा चहा टपरीवाले असू आम्हाला त्याचा अभिमान आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मी ठरवलं होतं सरकारमध्ये राहायचं नाही, पण घरी गेलो अन्…; देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा खुलासा
ये दोस्ती हम नहीं तोडेंगे! बॉलिवूडचे ‘ते’ स्टार ज्यांची मैत्री तुटली पण नात्यातील गोडवा अजूनही आहे कायम
रश्मिकाच्या हातात ‘ती’ गोष्ट पाहून घाबरली होती तिची आई, स्वत: रश्मिकाने सांगितला किस्सा