राजकीय नेते मंडळी काय बोलतील याचा सर्वसामान्य नागरिकांना कधीच अंदाज लावता येणार नाही हे अगदी खरं. नुकताच शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक अजब दावा केला आहे. सध्या सध्या सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींवर भाष्य करताना खैरेंनी एक अजब दावा केला आहे.
खैरे यांनी केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे थेट महाविकास आघाडी सरकारच धोक्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत. शिंदेंसोबत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व आमदार गेले आहेत.
यात वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरणारे यांचा देखील समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर काल बोरणारे यांच्या मतदारसंघात शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना चंद्रकांत खैरेंनी शिंदेंवर जहरी शब्दात निशाणा साधला.
यावेळी बोलताना खैरे यांनी म्हंटलं आहे की, ‘गुवाहाटीत आमदारांना बेकार करून ठेवलंय. त्यांच्यावर जादूटोणा करण्यात आला आहे. शिंदे हे जादूटोणा करतात. शिंदेंच्या तोंडामध्ये कायम एक कसलीतरी पांढरी गोळी असते. म्हणून त्यांनी जादूटोणा करून त्या लोकांना आपल्या गटात सामील करून घेतल्याचा अजब दावा खैरे यांनी केला आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांच्या बंडखोरीचे सूत्रधार आ. संजय शिरसाट असून त्यांनीच पाच आमदारांची बंडखोरीसाठी ‘मोट’ बांधल्याचा गंभीर दावा खैरे यांनी केला आहे. सध्या खैरे यांनी केलेलं व्यक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
तर दुसरीकडे खरच एकनाथ शिंदे यांना जादूटोणा करायला जमतो का? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. कारण मोठ्या प्रमाणात आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारच धोक्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते, त्यांचे नाव घेण्याचा सर्वांनाच अधिकार; संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
…म्हणून दोन वेळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देता देता थांबले, हैराण करणारी माहिती आली समोर
आमचे नेते उद्धव ठाकरेच असून कोणीही मातोश्रीवर आरोप करु नयेत; बंडखोर आमदाराचा इशारा कोणाला?
“शिवसेना काय आहे हे केसरकरांनी सांगू नये, मी आठवीत असल्यापासून शिवसेनेत आहे”