उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित होत होता? एकनाथ शिंदेंनी आमदारांसोबत बंडखोरी केल्यानंतर ते भाजपसोबत जातील हे तर आधीच ठरलं होतं पण सगळ्यांना वाटत होतं की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील.
आज स्वता देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं की, एकनाथ शिंदेंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होतील. देवेंद्र फडणवीस स्वता मंत्रिमंडळातून बाहेर राहणार आहेत. या सरकारमध्ये शिंदे गट आणि भाजपाचे मंत्री सहभागी असतील असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, जेव्हा महाविकास आघाडी सरकार पडलं त्यावेळी महाराष्ट्राला पर्यायी सरकार देणं आवश्यक होतं.
मी त्याचवेळी सांगितलं होतं की, हे सरकार चालणार नाही. आम्ही निवडणुका लादणार नाही हेसुद्धा मी सांगितलं होतं. त्यामुळं शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपचा गट आणि 16 अपक्ष तसेच छोट्या पक्षांचा गट सोबत आलो आहोत. या सगळ्यांचे पत्र त्यांनी राज्यपालांना दिलं आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पुढे भाजपची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, भाजपने हा निर्णय घेतला आहे. आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही. ही तत्वांची लढाई आहे, हिंदुत्वाची लढाई आहे, विचारांची लढाई आहे, असं फडणवीस म्हणाले. शिंदेंना मुख्यमंत्रीपदाबाबत ते म्हणाले की, शिंदे यांच्या नेतृत्वात मेट्रो, मराठी आरक्षण, ओबीसी, आरक्षणासह सर्व प्रश्न सोडवले जातील.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर राजकारणात खळबळ माजली होती. राजीनामा देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारमधील इतर दोन्ही पक्षांनी या काळात चांगलं सहकार्य लाभलं. पण माझ्या स्वत:च्याच पक्षातल्या काही लोकांनी सहकार्य केलं नाही. तसेच तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी आत्तापर्यंत चांगलं सरकार चालवलं. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या सर्व पक्षांनी आणि इतर प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
दरम्यान, ‘तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला किंवा दुखावले असतील तर मी माफी मागतो,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ज्या खात्यांचे विषय राहिलेले आहेत, ते पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ, असे आश्वासन देखील दिले.
महत्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदे होणार नवे मुख्यमंत्री, आणि मी मात्र…, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
एखादा माणूस ज्यादिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, तेव्हा…; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या जल्लोषावर बंडखोर संतापले, म्हणाले, ‘यामध्ये उद्धव ठाकरे कुठेही…’
तुम्ही प्रामाणिक, महाराष्ट्रातील लोक तुमच्या पाठिशी उभे राहतील..; राज यांनी केले उद्धव ठाकरेंचे कौतूक