Share

शिंदेंच्या बंडामागे ना मुख्यमंत्र्यांवरची नाराजी, ना भाजपचा हात; राग आहे राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यावर

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. ते मंगळवारी दिवसभर गुजरातमध्ये होते, पण ते आता आसामकडे रवाना झाल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (eknath shinde angry on this ncp leader)

एकनाथ शिंदे काही दिवसांपासून खुप नाराज होते. त्यांच्या या नाराजी मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचे म्हटले जात असले तरी त्यांच्या नाराजी मागे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचे एकनाथ शिंदेंचे समर्थक आमदार सांगताना दिसून येत आहे.

शिवसेना आमदारांना डावलून त्याच मतदारसंघात पराभूत झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना पवार हे ताकद देत आहे, असे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे जर सतत हेच घडत असेल, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत का राहायचे? असे त्या आमदारांचे म्हणणे आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे ना देवेंद्र फडणवीस आहेत, ना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या बंडामागे अजित पवार आहेत, अशी चर्चा आता रंगली आहे. सत्तेत राहूनही अजितदादा आमदारांचे तोंड दाबत असतील, तर सत्ता का हवी? असा प्रश्नही शिंदे समर्थक आमदारांनी उपस्थित केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत आमदारांना गुजरातला नेले होते. त्यामुळे त्यांची गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. शिंदे यांचे बंड करण्याची अनेक कारण आहे. राष्ट्रवादीचे नेते शिवसेना मंत्र्यांना आणि आमदारांना जुमानत नसल्याचे म्हटले जात होते. तसेच अनेकदा शिवसेना आमदारांनी याबाबत उघडपणे सांगितलेही होते.

दरम्यान, शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. अशात सत्तेचे नेतृत्व जरी शिवसेनेकडे असले तरी सुत्र मात्र राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे असल्याचे दिसून येतात, अशी तक्रारही अनेकदा शिवसेना आमदारांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार? संजय राऊतांच्या ट्विटने मिळाले सरकार बरखास्तीचे संकेत
शिंदेच्या तावडीतून अक्षरश पळालेले आमदार कैलास पाटील मुख्यमंत्री ठाकरेंसमोर ढसाढसा रडले…
आमची नाराजी उद्धव ठाकरेंवर नव्हे तर…; बंडखोर शिवसेना आमदाराने स्पष्टच सांगितलं

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now