eknath shinde angry on jitendra awhad | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. औरंगजेब हा क्रुर आणि हिंदुद्वेष्टा नव्हता, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात एक वेगळा वाद निर्माण झाला आहे. अनेक नेते यावर संतप्त प्रतिक्रिया देत आहे.
अनेकजण जितेंद्र आव्हाडांच्या व्यक्तव्याचा निषेध केला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी आव्हाडांवर केली आहे.
इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा जो काही प्रयत्न केला जातोय त्याचा निषेध जितका करावा तितका कमी आहे. औरंगजेबाच्या बाबतीत कोणाचं प्रेम उतू जात आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला. ज्याने महाराष्ट्रातील मंदिरं तोडली, माय-भगिणींवर अत्याचार केला, त्याचा पुळका कोणाला येतोय, त्यांची वृत्ती आता दिसून येतेय, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील त्यांचं प्रेम त्यांच्या वृत्तीतून दिसून येत आहे. याचा निषेध जितका करावा तितका कमी आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांना सुनावले आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड हे औरंगाबाद दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी औरंगजेबाबद्दल वक्तव्यं केलं आहे. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक संभाजी म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते, याची माहिती औरंगजेबाला कोणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे.
संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आले. तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्याठिकाणी बाजूला विष्णुचं मंदिर आहे. औरंगजेब क्रुर असता तर त्याने ते मंदिरही फोडलं असतं. तिथून संभाजी महाराजांना तुळापूरला नेण्यात आलं. तिथे काय झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
asim sarode : राज्यात लवकरच राष्ट्रपती राजवट लागू शकते कारण…; कायदेतज्ञ असीम सरोदे यांचे मोठे वक्तव्य
..तर मी तुमचे मंत्रीपद काढून घेईल; पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना खडसावले
मित्रांच्या मिठीत काजोल-अजय देवगणची लेक झाली बेफाम; लोकं म्हणाली १९ व्या वर्षी हे काय चाललय