राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. विशेष बाब म्हणजे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटलेले नाहीये, एकेकाळी सोबत असणारे शिंदे – उद्धव ठाकरे आता एकमेकांच्या विरोधात उभे आहेत.
उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे यांच्या भेटीकडे अवघ्या राज्याच लक्ष लागलं आहे. अशातच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (deepali sayed) यांनी केलेलं एक ट्विट चर्चेचा विषय बनला आहे. उद्धव ठाकरे -एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे संकेत दीपाली यांनी आपल्या ट्विटमधून दिलं आहे.
यामुळे आता लवकरच उद्धव ठाकरे – एकनाथ शिंदे यांची भेट होणार असल्याच बोललं जातं आहे. या भेटीसाठी मध्यस्थी केल्याबद्दल दीपाली सय्यद यांनी भाजपचे आभार देखील मानले आहेत. सध्या राजकीय वर्तुळात दीपाली सय्यद यांच्याच ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.
वाचा काय म्हंटलं आहे दीपाली सय्यद यांनी आपल्या ट्विटमध्ये..?
‘येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार?,’ असं टि्वट दिपाली सय्यद यांनी केलं आहे. ‘येत्या दोन दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब आणि आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार, हे ऐकून खूप बरं वाटलं, असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
@OfficeofUT
@mieknathshinde
@TawdeVinod
@Pankajamunde pic.twitter.com/20JnC3QSma— Deepali Sayed (@deepalisayed) July 16, 2022
पुढे त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘एकनाथ शिंदेसाहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धवसाहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली, हे स्पष्ट झालं. या मध्यस्थी करता भाजपा नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतिक्षा असेल”, असं देखील दीपाली यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटलं आहे की, “लवकरच आदित्य ठाकरे हे देखील मंत्रीमंडळात दिसावेत, शिवसेनेच्या 50 आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील.’
महत्वाच्या बातम्या-
भगवान शंकराप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विष प्राषण केलंय; अमित शहा असं का म्हणाले? जाणून घ्या..
भगवान विष्णुचे मंदिर पाडून दिल्लीची जामा मशिद उभारली, दावा खोटा निघाला तर कोणतीही सजा द्या
या पर्वतावर अजूनही आहे भगवान शंकराचे वास्तव, दिवसरात्र येत असतो ओम असा आवाज, वाचून आश्चर्य वाटेल
अरे देवा! कोर्टाने भगवान शंकरालाच बनवले आरोपी, कोर्टात हजर राहण्याची दिली नोटीस, मग भक्तांनी..