‘पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल.”, असे भाकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. ते याबाबत पुण्यात माध्यमांशी बोलत होते. पाटील यांच्या या विधानावरुन आता राजकारण रंगलं आहे. (eknath khadse slams chandrakant patil)
यावरच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले असल्याने ते अशी टीका करत असल्याचा खोचक टोला खडसे यांनी पाटील यांना लगावला. ते याबाबत पत्रकारांशी बोलत होते.
भुसावळ येथे अनिकेत पाटील मित्रमंडळ व अफ्फन क्रिकेट क्लबतर्फे आयोजीत स्व. निखीलभाऊ खडसे स्मृती चषक-२०२२ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या कार्यक्रमात रविवारी सायंकाळी एकनाथ खडसेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
पुढे बोलताना खडसे म्हणाले, “बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहेत. सरकार पाडायचा विचार केला व दुर्दैवाने सरकार पाडलं तरी बहुमताच्या जोरावर परत हेच सरकार येणार आहे,” असा विश्वासही एकनाथ खडसेंनी व्यक्त केला.
तसेच “चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार असून महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्यात. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागत असल्याने ते अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत, असे खडसे म्हणाले.
दरम्यान, राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापसून भाजप – शिवसेनेमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. अशातच राज्यातील सरकार पाडण्यासाठी सक्तवसुली दबाव टाकण्यात येत असल्याचा दावा करणारं पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यंकय्या नायडूंना लिहिलं.’
महत्त्वाच्या बातम्या
अरुण गवळीच्या दारूच्या अड्ड्यावर माझ्या वडिलांनी पैसे मोजण्याचे काम केले, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
‘हमने बहुत बरदाश्त किया है ना..तो बरबाद भी हम ही करेंगे’, संजय राऊतांचा भाजपला गर्भित इशारा
खेळाडूला संघात घ्यायचे नसताना मुद्दाम बोली लावून प्रतिस्पर्धीची पर्स खाली करणारे किरणकुमार गांधी कोण?
फक्त ५० रुपयांसाठी राखी सावंत करायची ‘हे’ काम, तिची स्ट्रगल स्टोरी वाचून तुम्हीही व्हाल भावूक






