Share

एकनाथ खडसेंची देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका; ‘मी टरबुज्या म्हणणार नाही, पण…’,

eknath khadse devendra fadanvis

भाजपला रामराम ठोकून सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असलेल्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे. “भाजपमध्ये चाळीस वर्षे हमाली केली, उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलं, पण मुख्यमंत्रीपदाची वेळ आल्यावर फडणवीसांना डोक्यावर बसवलं,” अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी आपली खदखद व्यक्त केली. ते जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे रेशन कार्ड वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. (eknath khadse reaction on cm and bjp devendra fadanvis)

यावेळी बोलताना खडसे यांनी भाजपावर शाब्दिक निशाणा साधला. “भारतीय जनता पार्टीमध्ये चाळीस वर्ष हमाली केली, उभं आयुष्य पक्षासाठी घातलं. त्याच पक्षात नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदापर्यंत आला आणि नाथाभाऊचं नाव वगळण्यात आलं. आपल्यावर अन्याय करण्यात आला, असे खडसे म्हणाले.

तसेच पुढे बोलताना खडसे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील खडसे यांनी टीका केली आहे. ‘मी टरबुज्या म्हणणार नाही, पण मी मुख्यमंत्रिपदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला आणि मला मुख्यमंत्री पदापासून डावललं, असे खडसे म्हणले.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा अधिकार हा खान्देशाचा होता, स्वातंत्र्याला ७० वर्ष होऊन गेली, पण खान्देशावर अन्याय करण्यात आला’, असेही खडसेंनी यावेळी सांगितलं. ‘हा नाथाभाऊ मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला होता, पण त्याचवेळी नाव वगळण्यात आलं आणि मला डावलून अन्याय केला,’ असंही खडसे यांनी म्हटलं.

तसेच ते म्हणाले, ‘गेल्या 70 वर्षात कोकणात नारायण राणे , मनोहर जोशी, बॅ. अंतुले असे तीन-तीन मुख्यमंत्री झाले. विदर्भात या आधी चार मुख्यमंत्री झाले आणि पाचवे देंवेंद्र झाले. मराठवाड्यातील विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झालेत.’

मात्र नाशिक, नगर,जळगाव, धुळे, नंदुरबार या उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर अधिकार असतानाही गेल्या सत्तर वर्षात एकदाही संधी देण्यात आली नाही. चाळीस-चाळीस वर्षे पक्षात आम्ही हमाली केली, आमचा अधिकार असतानाही मुख्यमंत्री पदापासून डावलण्यात आलं, सातत्याने अपमानित करण्यात आल्याच खडसे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
शोपियाँमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीत सांगलीच्या सुपूत्राला वीरमरण, २३ व्या वर्षी झाला शहीद
कारच्या भीषण अपघातात ५ महिन्याच्या बाळासह आईवडिलांचा मृत्यु, नागपूरातील धक्कादायक घटना
पठ्याने स्कुटर विकत घ्यायला आणली पोतंभर नाणी, शोरूम कर्मचाऱ्यांची अशी होती रिऍक्शन
मी त्यांचा शिवसैनिक आहे आणि…; तुरुंगातून सुटल्यानंतर हिंदूस्थानी भाऊचे मोठे वक्तव्य

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now