eknath khadse : राजकीय वर्तुळात सध्या राष्ट्रवादी – कॉंग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या घरवापसीची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतच खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलच चर्चेत आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी खडसे यांचा फोनवरुन संवाद झाला असल्याची माहिती रक्षा खडसे यांनी दिली आहे.
यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. शाहांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे भेट झाली नसल्याची माहिती रक्षा खडसेंनी दिली.
असं असलं तरी देखील, अमित शाहांची फोनवर चर्चा झाल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं आहे. या सर्व घडामोडींमुळे आता पुन्हा एकनाथ खडसे घरवापसी करणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. यावर आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी भाजप प्रवेशावर वक्तव्य केलं आहे. ‘अमित शहांना भेटू नये, असा नियम आहे का? माझा अमित शहा यांच्यासोबत फार पूर्वीपासूनचा परिचय आहे. मी अमित शहांना या आधीही अनेकदा त्यांना भेटलो आहे आणि नंतरही भेटणार आहे. त्यामुळे याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही,’ असं खडसे यांनी सांगितलं.
दरम्यान, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतील जाहीर सभेत भाषण करताना एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतली असल्याचा दावा केला होता. यामुळे तर आणखीनच खडसे यांच्या घरवापसीच्या चर्चाना वेग आला आहे.
याबाबत पत्रकारांनी रक्षा खडसे यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, स्पष्ट उत्तर देणे टाळले. ‘मला काही माहित नाही, मात्र आता तरी मी भाजपात व नाथाभाऊ राष्ट्रवादी असल्याचं त्यांनी सांगितलं.यामुळे आगामी काळात खडसे यांची राजकीय भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित शाह यांच्याशी नेमकी कोणती चर्चा झाली? हे अद्याप तरी समोर आलेलं नाहीये.
Bank : बँकांची कामे आत्ताच करून घ्या; ऑक्टोबर महिन्यात बँकांना आहेत ‘या’ २१ सुट्ट्या