शेअर बाजारात नेहमीच असे काही शेअर्स असतात, जे त्यांच्या गुंतवणूकदारांची कमी वेळात बक्कळ पैसा मिळवून देत असतात. आजही आपण अशाच एका स्टॉकबद्दल बोलणार आहोत. हा मल्टीबॅगर स्टॉक प्रचंड वेगाने वाढला आहेत. या मल्टीबॅगर स्टॉकचे नाव EKI एनर्जी सर्व्हिसेस आहे. या शेअरने गेल्या दहा महिन्यांतच आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ६,५०० टक्के परतावा दिला आहे. (eki energy stock high returns)
EKI एनर्जी सर्व्हिसेसने गेल्या वर्षी त्याचा IPO आणला होता. कंपनीने गुंतवणूकदारांना १०२ रुपये किमतीला शेअर्स वाटप केले होते. २०११ मध्ये सुरू झालेली, EKI एनर्जी सर्व्हिसेस ही भारतातील कार्बन क्रेडिट उद्योगातील सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी क्लायमेट चेंज अॅडव्हायझरी, कार्बन क्रेडिट्स ट्रेडिंग, बिझनेस एक्सलन्स अॅडव्हायझरी आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटमध्ये सेवा पुरवते.
EKI एनर्जी सर्व्हिसेसचा मुख्य व्यवसाय कार्बन क्रेडिट्सचा व्यापार आहे. कंपनीचे मार्केट कॅप ६,५५४ कोटी रुपयांच्या जवळपास आहे. डिसेंबर २०२१ च्या तिमाहीत कंपनीचा महसूल ६८७.८२ कोटी रुपये होता आणि कंपनीचा निव्वळ नफा १६१.२१ कोटी रुपये होता.
७ एप्रिल २०२१ रोजी EKI एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर १४७ रुपयांवर ट्रेड करत होते. आता कंपनीचे शेअर्स १४ फेब्रुवारी २०२२ रोजी बीएसईवर इंट्राडेमध्ये ९,७६५ रुपयांच्या पातळीवर पोहोचले. मात्र, नंतर तो घसरला आणि ९,३०० रुपयांवर बंद झाला.
कंपनीच्या शेअर्सने गेल्या १० महिन्यांत सुमारे ६,६०० टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने ७ एप्रिल २०२१ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती. तसेच त्याची गुंतवणूक त्याने कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे तब्बल ६६ लाख रुपये झाले असते.
EKI एनर्जी सर्व्हिसेसचे शेअर्स सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. जर आपण गेल्या ६ महिन्यांबद्दल बोललो तर कंपनीच्या शेअर्समध्ये ५०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत, EKI एनर्जीच्या शेअरची किंमत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज १,५६७.०५ रुपये होती.
आता १४ फेब्रुवारी २०२२ रोजी, कंपनीचे शेअरची शेअर मार्केटमध्ये ९,७०० रुपयांवर पोहोचले. जर एखाद्या व्यक्तीने १६ ऑगस्ट २०२१ रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर तेच एक लाख रुपये ६.१८ लाख रुपयांच्या जवळ गेले असते.
महत्वाच्या बातम्या-
आज फिर एक बिल्ली ने.., राऊतांच्या ग्रँड प्रेस कॉन्फरन्सवर अमृता फडणवीसांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शिर्डीतील साईबाबा मंदिर दहशतवाद्यांच्या रडारवर, पाकिस्तान कनेक्शन आलं समोर; तीन जण ताब्यात
याला म्हणतात नशीब! इलेक्ट्रिशियनचा मुलगा IPL लिलावात झाला करोडपती, लागली १.७ कोटींची बोली