Jacqueline fernandez | बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या नियमित जामिनाला ईडीने विरोध केला आहे. जामीन अर्जाच्या उत्तरात ईडीने अनेक मोठे खुलासे केले आहेत. तपासादरम्यान जॅकलीनने पुराव्यांशी छेडछाड केल्याचे ईडीचे म्हणणे आहे, जॅकलिनने मोबाईलमधील डेटा डिलीट केला.
ईडीचे म्हणणे आहे की, जॅकलिनने तपासादरम्यान देशातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता, परंतु एलओसी जारी केल्यामुळे ती यशस्वी होऊ शकली नाही. ईडीने असाही खुलासा केला की, जॅकलीनने तपासात कधीही सहकार्य केले नाही, पुरावे दाखवून किंवा इतर आरोपींसमोर बसून चौकशी केल्यानंतर तिने कबूली दिली.
ती पुराव्यांशी आणि आरोपींशी छेडछाड करू शकते. या विशेष युक्तिवादांसह ईडीने पटियाला कोर्टात आपला जबाब नोंदवला असून जॅकलिनला जामीन देण्यास विरोध केला आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला दिलेला अंतरिम दिलासा न्यायालयाने वाढवला आहे.
आज तिच्या जामिनाची मुदत संपत असल्याने ती सुनावणीसाठी पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली. न्यायालयाने फर्नांडिसला दिलेली अंतरिम सुरक्षा 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवले. न्यायालय 10 नोव्हेंबर रोजी नियमित जामीन याचिकेवर युक्तिवाद ऐकेल आणि कागदपत्रे देखील तपासेल.
ईडीने नुकतेच दुसरे आरोपपत्र दाखल केले असून त्यात फर्नांडीझचे नाव आरोपी म्हणून लिहीण्यात आले आहे. फर्नांडिस आणि आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही यांनी या प्रकरणात साक्षीदार म्हणून त्यांचे जबाब नोंदवले होते. यापूर्वी ईडीने जॅकलीनच्या 7.2 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी जप्त केल्या होत्या.
ईडीने या भेटवस्तू आणि मालमत्ता गुन्हातून मिळालेल्या पैशातून घेतलेल्या आहेत असं सांगितलं आहे. फेब्रुवारीमध्ये, चंद्रशेखरची कथित सहकारी पिंकी इराणी विरुद्ध ईडीने पहिली फिर्यादी तक्रार दाखल केली होती. पिंकीनेच सुकेशची बॉलिवूड अभिनेत्रींशी ओळख करून दिली.
पिंकी इराणी जॅकलीन फर्नांडिससाठी महागड्या भेटवस्तू निवडायची आणि नंतर सुकेश चंद्रशेखरच्या वतीने त्या भेटवस्तूंसाठी पैसे द्यायची, असा आरोप या आरोपपत्रात करण्यात आला आहे. ईडीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या प्रकरणातील पहिले आरोपपत्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रवीण सिंह यांच्या न्यायालयात दाखल केले होते.
नंतर फेब्रुवारीमध्ये ईडीने इराणी यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले. चंद्रशेखरने अनेक मॉडेल्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींवर सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले होते. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्याच्याकडून भेटवस्तू घेण्यास नकार दिला होता.
महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray : अदानींपाठोपाठ अंबानींचीही रात्री मातोश्रीवर हजेरी; तब्बल ३ तासांच्या भेटीत घडलं काय? वाचा..
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं! पदाधिकाऱ्यांनी दिला थेट सामूहिक राजीनामा, केले ‘हे’ गंभीर आरोप
Jayant Patil : राष्ट्रवादीचे जयंत पाटील भाजपच्या वाटेवर? भाजप नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ; म्हणाले, त्यांच्या घरावर…
Nayantara : आई होऊन काही दिवसच झाले की नयनतारावर आलं मोठं संकट, कोसळला दुखाचा डोंगर