अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने शाओमीचे तब्बल ५५५१.२७ कोटी रुपये जप्त केले आहेत. ईडीने शाओमी इंडिया विरुद्ध विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, १९९९ च्या तरतुदींनुसार ही कारवाई केली आहे. (ed raid on xiaomi india company)
शाओमी इंडिया ही कंपनी चीन-आधारित शाओमी समूहाच्या मालकीची उपकंपनी आहे. जप्त केलेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यात पडून होती. कंपनीने बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याप्रकरणी ईडीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये चौकशी सुरू केली होती. त्यानंतर आता त्यांनी ही कारवाई केली आहे.
शाओमी इंडियाने २०१४ मध्ये भारतात आपल्या प्रोजेक्टवर काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर २०१५ पासून त्यांनी पैसे पाठवण्यास सुरुवात केली होती. कंपनीने तीन विदेशी संस्थांना रॉयल्टीच्या नावाखाली ५५५१.२७ कोटी रुपयांचे परकीय चलन पाठवले आहे. या तिन्ही कंपन्यांमध्ये शाओमी समुहाची एक संस्था देखील सामील आहे
रॉयल्टीच्या नावाखाली एवढी मोठी रक्कम शाओमी ग्रुपच्या संस्थांच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली होती. इतर दोन यूएस स्थित असंबंधित संस्थांना पाठवलेली रक्कम देखील शाओमी समूहाच्या घटकांच्या अंतिम फायद्यासाठी होती. हे चौकशीतून समोर आले आहे.
शाओमी इंडिया एमआय ब्रँड नावाने भारतात मोबाईल फोनचा व्यापार करते. शाओमी इंडिया भारतातील निर्मात्यांकडून पूर्णपणे तयार केलेले मोबाइल सेट आणि इतर उत्पादने खरेदी करते. पण शाओमी इंडियाने ज्या तीन परदेशी संस्थांना हे पैसे हस्तांतरित केले आहेत त्यांच्याकडून कोणतीही सेवा घेतलेली नाही.
समूह घटकांमध्ये तयार केलेल्या विविध असंबंधित कागदपत्रांच्या माध्यमातून कंपनीने ही रक्कम रॉयल्टीच्या नावाने परदेशात पाठवली होती. जे FEMA च्या कलम ४ चे उल्लंघन आहे. परदेशात पैसे पाठवताना कंपनीने बँकांना दिशाभूल करणारी माहितीही दिली होती. त्यामुळे ईडीने शाओमीवर कडक कारवाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
संस्कृत आपली राष्ट्रीय भाषा असली पाहिजे कारण.., हिंदी भाषेच्या वादात आता कंगनाची उडी
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या; गाडीतील अंकुश चौधरी आणि केदार शिंदे…
एकेकाळी होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, आता निम्मी झाली संपत्ती, काय घडलं झुकरबर्गसोबत?